शिवसेना उबाठाला धक्का ; माजी जि. प. सदस्य हरिदास लोहकरे यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

इगतपुरीनामा न्यूज – धामणगाव जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचा भगवा हाती घेतला आहे. उबाठा शिवसेनेला हा मोठा धक्का असून धामणगाव गटात राजकीय समीकरण बदलणार आहेत. शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार नेते हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेना नेते विजय करंजकर जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, निर्मला गावित, पांडुरंग गांगड, उपजिल्हाप्रमुख मोहन बऱ्हे, शिवसेना नेते संपत काळे, रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख देविदास जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख शंकर गाढवे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला. पूर्वाश्रमीचा खेड व आताचा धामणगाव ह्या गटात जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे हरिदास लोहकरे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात जाहीर प्रवेश केला. हरिदास लोहकरे यांचा राजकीय प्रवास मायदरा धानोशीचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच पुढे इगतपुरी पंचायत समितीचे अपक्ष सदस्य म्हणून निवडून येऊन त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली. तत्कालीन जिल्हा परिषद खेड गटाची निवडणूक एकत्र शिवसेना पक्षातून लढवून ते जिल्हा परिषद सदस्य  झाले. जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. गत तीन वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीवर प्रशासक असतानाही जनतेप्रती असलेल्या कामावर त्यांच्याकडुन कोणताही खंड पडला नाही. सर्वसामान्य जनतेला विविध योजना मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यातून त्यांनी गटात कार्यकर्त्यांचे खूप मोठे संघटन बांधले आहे. प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव, अभ्यासू, शांत, संयमी स्वभाव, कामातून कार्यकर्ते जोडण्याची वेगळी हातोटी, कार्यकर्त्यावर मनापासून प्रेम करण्याचा स्वभाव यामुळे धामणगाव गटात सर्वच जाती समाजामध्ये त्यांना साथ देणारा व मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येक गाव वाडी वस्ती मध्ये असलेले त्यांच्या कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन खूप मोठे आहे. कौटुंबिक कारणास्तव काही काळ सार्वजनिक, राजकीय जीवनात अलिप्त राहिलेल्या हरिदास लोहकरे यांना गावोगावी असलेल्या त्यांच्या मित्र परिवार व जेष्ठ मंडळीनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरून जबाबदारी घेऊन त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढण्याचा आग्रह करून त्यांची मानसिकता तयार केली. गटातील सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख मोहन बऱ्हे, तालुका प्रमुख देविदास जाधव, उपजिल्हाप्रमुख युवा सेना शंकर गाढवे  उपस्थित होते. हरिदास लोहकरे यांच्या समवेत उबाठा सेनेचे गटप्रमुख साहेबराव झनकर, माजी गटप्रमुख पांडुरंग गाढवे, धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, उपतालुकाप्रमुख युवासेना हेमंत झनकर, अधरवडचे सरपंच ज्ञानेश्वर डमाळे, धामणगावचे माजी सरपंच त्र्यंबक बरतड, नामदेव घुमरे, अशोक गाढवे, बारशिंगवेचे उपसरपंच पोपट लहामगे, अधरवड शाखाप्रमुख नवनाथ बऱ्हे, राजाराम बेरड, संतोष केरू झनकर, ज्ञानेश्वर झनकर, गोकुळ झनकर, बारशिंगवे माजी सरपंच गुलाब भले, भरवीर भंडारदरावाडीचे उपसरपंच कमलाकर सांबरे, अडसरेचे सामाजिक कार्यकर्ते संपत फोडसे, राजू भले आणि गटातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हा पक्ष प्रवेश प्रातिनिधिक स्वरूपात घेतला असून लवकरच गटातील समर्थक कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश सोहळा जोरदार होणार असल्याचे गटातील पक्ष पदाधिकारी यांनी सांगितले.

error: Content is protected !!