वंचित आघाडी आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार – जेष्ठ नेते दादाभाऊ शिरसाठ

इगतपुरीनामा न्यूज – ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद, मनपा निवडणुका पूर्ण ताकदीने स्वबळावर लढू असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते दादाभाऊ शिरसाठ यांनी केले.  वाडीवऱ्हे येथे वंचित बहुजन आघाडीच्या महत्वाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुका निरीक्षक मधुकर कडलग यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी निवडणुकीबाबत अहवाल तयार करणे, माहिती जमा करणे, गट गणात चाचपणी करणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत यश मिळावे यासाठी तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सामोरे जावे लागणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वतःची लढाई स्वतः जिंकायची असून आपण किती ताकदीने उतरणार आहोत. युती करण्याबाबत पुढचे पुढे ठरवू. येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपला ठसा उमटवेल असा विश्वास श्री. शिरसाठ यांनी व्यक्त केला. यावेळी ॲड. भारत बुकाणे, शरद सोनवणे, विक्रम जगताप, आर. वाय. गाडे, रंजना साबळे, मधुकर बागुल, एन. के. सोनवणे, तानाजी सोनवणे, संजय सोनवणे, राजेंद्र क्षीरसागर, किशोर भडांगे, संदीप भरीत, विक्रम दोंदे, अमोल जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!