जन्मदिनाच्या पर्वावर श्रद्धांजली देण्याची आली वेळ : जेष्ठ पत्रकार अशोक शिंदेच्या निधनाने हळहळले ग्रामस्थ

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हेचे जेष्ठ पत्रकार तथा पोलीस मित्र अशोक शिंदे यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. वाडीवऱ्हे गावी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ग्रामस्थ शोकाकुल झाले. आज गुरुवारी आठवडे बाजार असतांनाही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने  बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. अशोक शिंदे यांचा काल २ फेब्रुवारीला वाढदिवस होता. समाजमाध्यमातून त्यांना शुभेच्छा देणारे […]

शेतकरी, कामगार आणि श्रमिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयुष्यभर झपाटलेले दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव गोडसे

कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांचे नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. संसरी ता. जि. नाशिक येथील स्वातंत्र्यसैनिक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते समाजकारणात नेहमी अग्रेसर असणारे नामदेवराव शिवराम गोडसे यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्याचबरोबर ते इगतपुरीचे पहिले आमदार कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने, माजी आमदार दिवंगत कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड गोविंद पानसरे, […]

७ ग्रामपंचायत सदस्यांना हेलीकॉप्टरने गावी आणणारे हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावचे नाव देशपातळीवर चर्चेत आणणारे माजी सरपंच चंद्रकांत गतीर वय ५० यांचे आज निधन झाले. २०१२ मध्ये मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीच्या प्रसंगी आपल्या समर्थक ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने त्यांनी गावात आणले होते. ह्या ऐतिहासिक घटनेमुळे त्यांचे नाव हायटेक सरपंच म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते. ११ पैकी ७ सदस्यांना हेलिकॉप्टरने आणून […]

स्व. इंदुमती ( आईसाहेब ) गुळवे : विकासाचे रामराज्य घडवणारे हिमालयाच्या उंचीचे उत्तुंग व्यक्तिमत्व

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा लाखो दीनदुबळ्या लोकांची सेवा, गावोगावी विकासाचे पर्व, शिक्षणाची ज्ञानधारा, हजारो कार्यकर्त्यांची घडवणूक आणि अनेक कुटुंबांना हक्काची भाकरी मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असे लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे सर्वांच्या मनामनात आहेत. हे सगळं विकासाचे विश्व उभे करणाऱ्या स्व. दादासाहेबांच्या नंतर त्यांचे सुपुत्र ऍड. […]

जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा इंदुमती गोपाळराव गुळवे यांचे निधन : बेलगाव कुऱ्हे येथे आज रात्री ९ वाजता होणार अंत्यविधी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिवंगत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या सौभाग्यवती इंदुमती गोपाळराव गुळवे यांचे आज वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. इंदिरा काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या त्या मातोश्री होत. स्व. इंदुमती गुळवे यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद अशी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. […]

नांदडगावचे प्रगतिशील शेतकरी भागुजी पाटील खातळे यांचे निधन

नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ नांदडगाव ता. इगतपुरी येथील प्रगतशील शेतकरी तथा घोटी बाजार समितीचे माजी संचालक व राजकीय नेते भागुजी अर्जुन पाटील खातळे वय ९२ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना-जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एकेकाळी कुस्तीगीर पहिलवान व वस्ताद म्हणून ते प्रसिद्ध होते. राजकीय क्षेत्रात […]

भावपूर्ण वातावरणात प्राचार्या डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांची श्रद्धांजली सभा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांना वयाच्या ८५ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी व स्त्रियांच्या विकासासाठी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेतून अविरत प्रयत्न केले. त्यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी सोसायटीच्या प्रिं. टी. ए. कुलकर्णी सभागृहात गोसावी व देशपांडे परिवाराचे सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, […]

गोखले एज्युकेशन सोसायटीचे मातृतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड : प्राचार्या डॉ. सुनंदाताई गोसावी यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या व नाशिकमधील महिला शिक्षण व सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या प्राचार्या डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांचे आज ३० नोव्हेंबरला दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. संस्थेचे सचिव व डायरेक्टर जनरल डॉ. मो. स. गोसावी ह्यांच्या त्या पत्नी व संस्थेच्या एचआर डायरेक्टर व एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. […]

समृद्ध शेतकरी, संस्कारक्षम पिढी आणि सुजाण समाज निर्मितीसाठी झटणारे चालते बोलते विद्यापीठ :  स्व. कारभारी ( दादा ) गीते

जगाचा पोशिंदा कष्टकरी शेतकरी जगला पाहिजे. सर्व उद्योगाचा पाया फक्त शेतीच आहे. शेती, शेतकरी आणि देश ही त्रिसूत्री जगासाठी उपयुक्त आहे असा दृढ विश्वास सहप्रयोग सिद्ध करून हा सार्थ विश्वास अनेक शेतकऱ्यांत निर्माण करणारे स्व. कारभारी गिते देवाचीची देणगी होती. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराला जाणे शक्य नसते. अशा ठिकाणी स्व. कारभारी गीते यांच्या रूपाने दैवी विचारांचे […]

मुकणे येथील शांत व संयमी व्यक्तिमत्त्व लक्ष्मण बोराडे यांचा आज दशक्रिया विधी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ मुकणे ता. इगतपुरी येथील नंदु बोराडे यांचे वडील लक्ष्मण तुकाराम बोराडे ( वय ७५ ) यांचे मंगळवारी दि. २ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणुन ते सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, पुतणे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पारले कंपनीचे कामगार […]

error: Content is protected !!