जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा इंदुमती गोपाळराव गुळवे यांचे निधन : बेलगाव कुऱ्हे येथे आज रात्री ९ वाजता होणार अंत्यविधी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिवंगत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या सौभाग्यवती इंदुमती गोपाळराव गुळवे यांचे आज वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. इंदिरा काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या त्या मातोश्री होत. स्व. इंदुमती गुळवे यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद अशी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. जनमानसात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध होते. गुळवे परिवाराच्या राजकीय जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या दुःखद निधनाने इगतपुरी तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.  त्यांचा अंत्यविधी बेलगाव कुऱ्हे ता. इगतपुरी येथे आज रात्री ९ वाजता होणार आहे.

इगतपुरीनामाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली

Leave a Reply

error: Content is protected !!