इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावचे नाव देशपातळीवर चर्चेत आणणारे माजी सरपंच चंद्रकांत गतीर वय ५० यांचे आज निधन झाले. २०१२ मध्ये मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीच्या प्रसंगी आपल्या समर्थक ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने त्यांनी गावात आणले होते. ह्या ऐतिहासिक घटनेमुळे त्यांचे नाव हायटेक सरपंच म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते. ११ पैकी ७ सदस्यांना हेलिकॉप्टरने आणून सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. २०१२ ते २०१७ पर्यंत कार्यकाळ असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी हायटेक सरपंच म्हणून काम पाहिले. ह्या काळात त्यांनी अनेक विकासकामे केली. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच विविध क्षेत्रातून दुःख व्यक्त करण्यात आले.