भावपूर्ण वातावरणात प्राचार्या डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांची श्रद्धांजली सभा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांना वयाच्या ८५ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी व स्त्रियांच्या विकासासाठी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेतून अविरत प्रयत्न केले. त्यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी सोसायटीच्या प्रिं. टी. ए. कुलकर्णी सभागृहात गोसावी व देशपांडे परिवाराचे सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नाशिक विभागातर्फे मनोगत बीवायके. महाविद्यालयाचे प्राचार्य व नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी ह्यांनी केले.

मुंबई विभागीय सचिव प्राचार्य डॉ. सुहासिनी संत ह्यांनी मुंबई विभागातर्फे श्रद्धांजली अर्पण केली. भावपूर्ण शब्दांत स्त्री शिक्षणाबद्दल सुनंदाताईंची तळमळ त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या पालघर विभागातर्फे डॉ. अंजली कुलकर्णी ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गिरीश नातू ह्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी गोसावी मॅडमच्या सर्वांशी प्रेमळ वागणुकीबद्दलच्या आठवणी जागृत केल्या. शिवपार्वती प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत जोशी ह्यांनी गोसावी मॅडमच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी मॅडमच्या आध्यात्मिक उपासने बद्दल आठवणी सांगितल्या.

गोसावी परिवाराच्या वतीने त्यांच्या ज्येष्ठ कन्या एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी डॉ. सुनंदाताईंच्या गृहिणी, आई, प्राचार्या, स्त्री शिक्षणाच्या खंद्या पुरस्कर्त्या अशा विविध पैलुंवर प्रकाश टाकला. गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रिं. एस. बी. पंडित ह्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व जनरल डायरेक्टरसुनंदाताईंचे पती डॉ. मो. स. गोसावी ह्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सुनंदाताईंनी भारतीय स्त्रीचा आदर्श जपला. त्या शिक्षणाबद्दल आग्रही होत्या. हे करताना कुटुंबात, समाजात नैतिक मूल्यांच्या रुजवणी बद्दल आग्रही होत्या असे ते म्हणाले. श्रद्धांजली कार्यक्रमाला श्रीकांत रहाळकर, ॲड. जयंत जायभावे, ॲड. एम. वाय. काळे, प्रा. यशवंत पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन  प्रा. डॉ. प्रणव रत्नपारखी, प्रा. डॉ. मुग्धा जोशी यांनी केले. प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी ह्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता दीक्षित गुरुजींच्या शांती पठणाने झाली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!