शकुंतलाबाई सोनवणे यांचे निधन : गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे यांना मातृशोक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

गोंदे दुमाला येथील कै. शकुंतलाबाई खंडू सोनवणे वय – 65 वर्षे यांचे आज निधन झाले. गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे यांचा त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. शकुंतलाबाई खंडू सोनवणे यांनी आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सुसंस्कार दिले. शून्यातून मोठी प्रगती साधण्यासाठी शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांच्या मनमिळावू स्वभावाने त्या प्रसिद्ध होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व क्षेत्रातील नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला. गोंदे दुमाला परिसरातसह इगतपुरी तालुक्यातील विविध लोकप्रतिनिधींनी शोकसंदेश पाठवले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!