नांदडगावचे प्रगतिशील शेतकरी भागुजी पाटील खातळे यांचे निधन

नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

नांदडगाव ता. इगतपुरी येथील प्रगतशील शेतकरी तथा घोटी बाजार समितीचे माजी संचालक व राजकीय नेते भागुजी अर्जुन पाटील खातळे वय ९२ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना-जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एकेकाळी कुस्तीगीर पहिलवान व वस्ताद म्हणून ते प्रसिद्ध होते. राजकीय क्षेत्रात कै. गोपाळराव गुळवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचही ते निष्ठावान खंदे समर्थक होते. राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना सांजेगाव-नांदडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच, तालुका खरेदी विक्री संघावर व्हाइस चेअरमन, संचालक, आहुर्ली आदिवासी सोसायटीचे सलग दहा वर्षे चेअरमन तर महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ नाशिक या संस्थेचे संचालक होते. सुखदेव खातळे यांचेसह इगतपुरी वकिल संघाचे माजी अध्यक्ष ॲड. दिलीप खातळे, आहुर्ली आदिवासी सोसायटीचे चेअरमन रघुनाथ खातळे यांचे ते वडिल होते. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!