दुर्दैवी विजय – मृत्यूनंतर सर्वोच्च संस्थेच्या मतमोजणीत स्व. इंदुमती गुळवे यांचा ९६ मतांनी विजय : ४ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीचा निकाल घोषित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

चार वर्षांपूर्वी झालेल्या राज्यपातळीवरील झालेल्या महत्वपूर्ण निवडणुकीत इगतपुरी तालुक्याचे भूषण स्व. इंदुमती गोपाळराव गुळवे ह्या ९६ मतांनी निवडून आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर एन. व्ही. आघाव यांनी आज निकाल घोषित केला. इगतपुरी तालुक्याचे मानबिंदू स्व. लोकनेते गोपाळराव गुळवे यांच्यानंतर एवढा मोठा विजय स्व. इंदुमती गुळवे यांनी मिळवला. मात्र दुर्दैवाने ह्या विजयापूर्वीच म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये स्व. इंदुमती गुळवे यांचे देहावसान झालेले आहे. त्यामुळे मिळालेला विजय दुर्दुवी ठरला आहे. मृत्यूपश्चात मिळालेल्या विजयामुळे इगतपुरी तालुक्यात स्व. इंदूमती गुळवे यांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातून ह्या निवडणुकीसाठी फक्त २ जण रिंगणात होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे हे सुद्धा विजयी झाले आहेत.

महाराष्ट्रातील ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापती आणि संचालकांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणे ही राज्यस्तरीय शिखर सहकारी संस्था आहे. ह्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१ मार्च २०१८ ला राज्यातील १६ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आलेले होते. मतमोजणी २३ मार्च २०१८ ह्या दिवशी निश्चित करण्यात आलेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेच्या २० मार्च २०१८ च्या आदेशान्वये निवडणूक निकाल जाहीर करण्यास स्थगिती
देण्यात आलेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये उच्च न्यायालयाने अखेर १५ मार्च २०२२ च्या आदेशान्वये स्थगिती उठवून मतमोजणी करण्यास परवानगी दिलेली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणे या संस्थेची मतमोजणी आज घेण्यात आली. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. शिवाजीनगर, पुणे येथे मतमोजणी संपल्यानंतर लगेचच निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला. दुर्दैवाने एवढा मोठा विजय होऊनही विजयी झालेल्या स्व. इंदुमती गुळवे आपल्यात नसल्यामुळे इगतपुरी तालुक्यात दुःख व्यक्त करण्यात आले.

न्यायालयीन आदेशामुळे ४ वर्षानंतर आज निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये बाजार समितीच्या माजी सभापती स्व. आईंनी मोठा विजय प्राप्त केला. मात्र दुर्दैवाने स्व. आई आपल्यात नाहीत. स्व. दादासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून राज्यपातळीवरील मोठ्या विजयाचा क्षण स्व. आईच्या आठवणी जाग्या करून गेला.

- जितेंद्र सांगळे, सचिव कृउबा घोटी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!