विज्ञानाद्वारे शाश्वत विकास होण्यासाठी जागरूकता वाढवणे आवश्यक – प्रा. डॉ. दत्तात्रय लोखंडे : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

भारतीय भौतिकवादी सर चंद्रशेखर वेंकटरमन यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन’ संपन्न साजरा केला जातो. संशोधकांच्या कार्याचा आढावा विद्यार्थी आणि तरुणांसमोर ठेऊन देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती व्हावी हा मुख्य उद्देश आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन अभावामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजही समाज अंधश्रद्धेला बळी पडत आहे. म्हणून समाजामध्ये विज्ञानाची रूची, जागरूकता निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद व ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ मंत्रालय प्रयत्नशील आहे. नवोदित वैज्ञानिकांना प्रोत्साहित करणे आणि तंत्रज्ञान विज्ञानाची गरज व महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणे, त्यातून शाश्वत विकास होणे हाच खरा मानस राष्ट्रीय विज्ञान दिनामागे आहे असे प्रतिपादन इगतपुरी महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय लोखंडे यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांची जयंतीनिमिताने व्याख्यान प्रसंगी श्री. लोखंडे बोलत होते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे म्हणाले की, भारत कृषिप्रधान देश आहे. शेतककऱ्यांनी शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान अवगत केलेले आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा विज्ञानाची कास धरल्यामुळे क्रांती घडवून आणलेली आहे. प्रास्ताविक व स्वागत विज्ञान शाखाप्रमुख डॉ. अजित नगरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. ऋषिकेश गोतरणे, सूत्रसंचालन प्रा. अशोक चौधरी, आभार प्रा. अनिल जगदाळे यांनी मानले. प्रा. शरद कांबळे, प्रा. मनोहर जोपळे, प्रा. किरण शिंदे, प्रा. दिपाली पडोळ, प्रा. शितल जमधडे, प्रा. आशुतोष खाडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!