ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
त्र्यंबकेश्वर हे साक्षात कैलास असल्याची अनेक साधु महंत व वारकऱ्यांची भावना आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ हे विश्वगुरु असल्याने त्यांच्या समाधीमुळे त्र्यंबक पावन झाले आहे. ल्या समाधी मंदिराचा सर्वागिण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून वारकऱ्यांना कायमस्वरूपी पायाभुत सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडे २२ कोटी २३ लाख रुपयाचा विकास आराखडा प्रस्तावित आहे. त्यास मंजुरी व निधीसाठी पाठपुरावा करू असे प्रतिपादन संत निवृत्तीनाथांच्या शासकीय महापुजेनंतर आमदार हिरामण खोसकर यांनी केले.
पौषवारी निमित्ताने संत निवृत्तीनाथ समाधीची शासकीय महापुजा नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, युवा किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, उपनगराध्यक्ष सायली शिखरे, नगरसेवक श्याम गंगापुत्र, माजी विश्वस्त पुंडलिक थेटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, राष्ट्रवादी काॅग्रेसचे बहीरु मुळाणे, अरुण मेढे, काॅग्रेसचे दिनकर मोरे, वारकरी मंडळ शहराध्यक्ष किरण चौधरी, दिपक लोणार, अशोक घागरे, भारती बदादे, माधवी भुजंग, पुजारी योगेश गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे प्रशासक सदस्य ॲड. भाऊसाहेब गंबीरे यांनी प्रास्ताविक करून संस्थान तर्फे करण्यात आलेल्या कामाची माहीती दिली. भव्य समाधी मंदिर उभारण्यासाठी शासनाकडुन तीर्थक्षेत्रा प्रमाणे निधी आणण्यासाठी संस्थानच्या पाठीशी उभे राहुन वारकऱ्यांच्या आद्यपीठाचा विकास करावा अशी मागणी केली. यावेळी समाधी संस्थांन व नगरपालिकेतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजित सकाळे, गणेश मोरे, शेखर सावंत, जयराम मोढे,।युवराज माळी,।तानाजी कड, हेमंत महाले आदी उपस्थित होते. रात्री ११ ते १ या वेळेत संस्थानकडुन नाथांची महापुजा करण्यात आली. धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे, धर्मादाय सहाआयुक्त अनंत लिपते, प्रशासक ॲड. भाऊसाहेब गंभीरे, वारकरी यांच्या हस्ते गुरुवारी रात्री १२ वाजता महापुजा करण्यात आली. यावेळी गंगाराम झोले, संदिप मुळाणे, विष्णु बदादे, दादा आचारी, मनोज भांगरे आदी उपस्थित होते. रात्री वारकरी मंडाळाचे भजन जागर झाले. सोबत बेलापूर महाराज यांचे किर्तन झाले.
संत निवृत्तीनाथ संस्थानाच्या पायाभुत सुविधासाठी साठी २२ कोटी २३ लाख विकास आराखडा शासनदरबारी सादर आहे. आराखडा अर्थसंकल्पात प्रस्तावित असुन आजच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक आहे. मंदिराचा सर्वागिण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन. – आमदार हिरामण खोसकर