त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात ‘निर्भय कन्या’ कार्यशाळा संपन्न : स्त्रियांची जागरूकता वाढवण्यासाठी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

मविप्र समाजाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे निर्भय कन्या अभियान अंतर्गत कार्यशाळा विविध व्याख्यानद्वारे उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेचे  उदघाटन करून पहिले पुष्प प्रमुख व्याख्याते ॲड. भास्कर मेढे यांनी गुंफले. ‘स्त्री हक्क व स्त्री विषयक कायदे’ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, स्त्रियांना मिळालेला घटनात्मक  मूलभूत हक्क व अधिकार स्त्रियांनी समजून घेणे काळाची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनात निर्भय बनून क्रांतिकारक बदल घडून आणला पाहिजे. शिकून प्रत्येक विद्यार्थिनीने न घाबरता झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

दुसरे पुष्प डॉ. माधवी लोंढे यांनी गुंफले. आपल्या मनोगतात  त्यांनी स्त्रियांनी  स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करून संवाद साधला. तिसरे पुष्प पोलीस अधिकारी अश्विनी टिळे यांनी गुंफले. त्यांनी विद्यार्थीनींना स्वसंरक्षणासाठी आपण काय करायला हवे या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वसंरक्षणासाठी काही महत्वाचे प्रक्षिक्षण दिले. पद्मा चव्हाण यांनीही स्वसंरक्षणासाठी आवश्यक बाबीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात  त्यांनी सांगितले की, स्वतःच्या संरक्षणासाठी मुलींनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता शारीरिक, मानसिक, भावनिक, आरोग्याच्या विकासातून निर्भयतेकडे वाटचाल केली पाहिजे. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते झाली. प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. समाधान गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. एच. कोळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आर. जे. बहोत यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!