
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – नैसर्गिक शेती या विषयावर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण झाले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक व कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत हे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन कार्यक्रमावेळी आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, वरिष्ठ शास्त्रज्ञ नितीन ठोके, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे, प्रशिक्षण वर्गाचे समन्वक मंगेश व्यवहारे, कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ हेमराज राजपूत यांनी मार्गदर्शन केले. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, त्र्यंबकेश्वरचे तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे, मंडळ कृषी अधिकारी संतोष सातदिवे, राजेंद्र चव्हाण, कृषी पर्यवेक्षक नारायण पवार, कृषी सहाय्यक शिवचरण कोकाटे, वाय. टी. दाते, हरीश चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे कृषी सहाय्यक प्रल्हाद दिघे, देशमुख आदी उपस्थित होते. कृषी सहाय्यक अरुण राऊत यांनी सुत्रसंचालन केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे, महेंद्र सोनवणे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.