इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो गावाचे शेतकरी अशोक किसन सोनवणे, अरुणा अशोक सोनवणे यांचे चिरंजीव रोहित अशोक सोनवणे यांची मुंबई शहर पोलीस या ठिकाणी निवड झाली आहे. ही बातमी समजताच पिंप्री सदो गावातील त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. सर्वांनी रोहितला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पिंप्री सदो गावाच्या इतिहासात रोहित हा पहिला […]
इगतपुरीनामा न्यूज : श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे यंत्रसामग्री १ ऑक्टोंबरपासून येण्यास सुरवात होणार आहे. उर्वरित लागणाऱ्या लिंक कोनर मशीन वस्त्रोद्योग विभागाच्या उर्वरित भागभांडवलामधून व सामाजिक न्याय विभागाच्या उर्वरित कर्जामधून यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ही सूतगिरणी उत्पादनाखाली […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील राजमुद्रा सामाजिक शैक्षणिक मंडळातर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, होतकरू विद्यार्थ्यांसह सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हरी होम साई ढाबा संचालक अकबरशेठ पठाण यांच्या सौजन्याने व तरुणांचे आदर्श माजी अध्यक्ष संदीप नाठे व राजमुद्रातर्फे उद्या शनिवारी २६ ऑगस्टला हा कार्यक्रम […]
इगतपुरीनामा न्यूज : राज्यात दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात जवळपास तीस हजार जागा भरण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्पष्ट केले होते. त्यासाठीचे वेळापत्रकही त्यांनी जाहीर करून 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र 15 ऑगस्ट नंतर आज सहा […]
इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रतिष्ठानतर्फे इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. उद्या रविवारी १३ ऑगस्टला वतीने पालकमंत्री आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी ११ […]
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्या सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील अनेक उद्योजक, कारखानदार आणि संस्था उपस्थित […]
IIT-JEE… NEET… पॅकेज… करिअर… हे आजच्या युगातले परवलीचे शब्द बनलेत… शिक्षण म्हटलं की स्पर्धा असणार हे मान्य; मात्र JEE आणि NEET यांसारख्या कस बघणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेच्या खोल गर्तेत ढकलण्याआधी लेकरांचा कल, त्यांची क्षमता याचा विचार किती पालक करतात? परिणामी मुलांच्या मनावर प्रचंड दडपण आणि ताण येतो. केविलवाणी होऊन जातात बिचारी मुलं. शिकणं नकोसं होऊन जातं. […]
लेखन – मधुकर घायदार, नाशिक उदिष्टे : पारंपारिक शिक्षणात पदवीधर झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे इंजिनिअरींग डिप्लोमा ( पदविका ) करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. कुशल इंजिनीअर तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे तंत्रनिकेतनचे उदिष्ट.व्याप्ती : राज्यात प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शासकीय तसेच खासगी तंत्रनिकेतने आहेत. राज्यात एकूण तीनशे अठ्ठ्यात्तर शासकीय […]
इगतपुरीनामा न्यूज – मार्च २०२३ मध्ये राज्य शासनाच्या माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल उद्या ( दि. ०२ ) जाहीर होणार आहे. परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर याबाबतचे प्रकटन जाहीर करण्यात आले असून त्यात उद्या दुपारी एक वाजेनंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल पाहता येईल, असे म्हटले आहे. दरम्यान दहावी नंतरच्या उच्च […]
इगतपुरीनामा न्यूज – फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्य शासनाच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( दि. २५ ) जाहीर होणार आहे. परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर याबाबतचे प्रकटन जाहीर करण्यात आले असून त्यात उद्या दुपारी दोन वाजेनंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल पाहता येईल, असे म्हटले आहे. दरम्यान बारावी नंतरच्या उच्च […]