सीएमए इन्स्टिट्यूट फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर : नाशिक चॅप्टरच्या ९४ विद्यार्थ्यांनी मिळवले यश 

इगतपुरीनामा न्यूज – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंटस ऑफ इंडिया ( आयसीएमएआय ) तर्फे डिसेंबरला घेण्यात आलेल्या फाऊंडेशन परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. नाशिक चॅप्टरच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत १६१ विद्यार्थ्यांपैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अदिती कटाळे हिने २९८ गुण मिळवत नाशिकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. महेश गडाख व दादाजी गरुड याने २९० गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. जितेश अनवट हा २८८ गुण मिळवुन नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे नाशिक चॅप्टरच्या कार्यकारिणीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नाशिक शाखेतर्फे घेण्यात येणाऱ्या कोचिंग क्लासचे सीएमए भगवान खांदवे, सीएस नयन देशमुख सीएमए सुरज लाहोटी व प्रो. हेमंत डूकले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियातर्फे १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशन परीक्षा घेण्यात येते. यात उत्तीर्ण विद्यार्थी हे पुढील इंटरमेडिएट परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेण्यात आली. नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए अमित जाधव, उपाध्यक्ष सीएमए मयुर निकम, सचिव सीएमए प्रकाश राजपूत, खजिनदार सीएमए नवनाथ गांगुर्डे, सदस्य सीएमए मैथली मालपुरे, सीएमए आरिफ मन्सूरी, सीएमए संतोष ब्राम्हणकर, सीएमए धनंजय जाधव, सीएमए कैलास शिंदे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कॉमर्स/वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सीएमए सर्वोत्तम करियर असून विद्यार्थी व्यवसाय व नोकरी या दोघांमध्येही उत्तम करिअर करू शकतात. त्यामुळे सीएमए करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सीएमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १२ वी नंतर सफाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इंटरमेडिएट पात्र होतात. अशा विद्यार्थांना जून २०२५ च्या परीक्षेसाठी ३१ जानेवारी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख असून त्याच्या आत प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी ०२५३ – २५००१५०/२५०९९८९ /९४२३७३४९०० यावर संपर्क साधण्याचे आवाहन नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए अमित जाधव यांनी केले.  

Similar Posts

error: Content is protected !!