इगतपुरीनामा न्यूज – सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान व्हावे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करता यावी त्याचे स्वरूप समजावे यासाठी एज्यूमेट तर्फे राज्यभर भारत टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केलेले होते. ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मोडाळे येथे ही परीक्षा संपन्न झाली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करत असताना पायाभूत संख्याज्ञान आणि साक्षरता हे FLN चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाठ्यपुस्तकात ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या अध्ययनष्पत्तीच्या थीम नुसार या परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. इगतपुरी तालुक्यातील ज्ञानदा माध्यमिक मोडाळे, जिल्हा परिषद मोडाळे, माध्यमिक विद्यालय वाडीवऱ्हे, जि. प. शाळा वाडीवऱ्हे, एम. जी. विद्यालय इगतपुरी व नुतन मराठी शाळा इगतपुरी या शाळांतील पहिली ते आठवीच्या १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक जगदीश मोरे, पर्यवेक्षक म्हणून प्रविण भडांगे, विकास गोऱ्हे, अर्जुन कालेकर, अमोल धात्रक, निवृत्ती खताळे, सुनिता सोनवणे, प्रकाश शेवाळे यांनी काम पाहिले. नेमणूक करण्यात आली होती. मुख्याध्यापिका चंद्रभागा तुपे यांनी नियंत्रक म्हणून भूमिका पार पाडली. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मार्गदर्शक म्हणून बीटीएस तालुका समन्वयक माधुरी पाटील यांनी काम पाहिले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group