फेब्रुवारी २०१७ मधील इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील ५ गट आणि १० गणांतील विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे देत आहोत. इगतपुरीनामा पोर्टलच्या अनेक वाचकांनी वारंवार केलेल्या सूचनेनुसार ही माहिती उपलब्ध करीत आहोत. – संपादक इगतपुरीनामा न्यूज पोर्टल नांदगाव सदो गटविजयी : कावजी ठाकरे पक्ष – शिवसेनामिळालेली मते : […]

अबब….अंधांनी रेखाटले माजी आमदार निर्मला गावित यांचे तैलचित्र : वाढदिवसाच्या दिवशी मिळालेल्या अनोख्या भेटीने  निर्मला गावित गहिवरल्या

अंधांसाठी औषधींवर विशिष्ट चिन्हांकित ओळखीसाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार : सौ. गावित भास्कर सोनवणे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ अंधांच्या आयुष्याचा प्रारंभ काळ्याकुट्ट अंधाराच्या जाणिवेतच झाला.. निसर्ग, व्यक्ती, सहकारी, शिक्षक, फुल आणि फुलपाखरे फक्त त्यांच्या अंधाऱ्या कोपऱ्यातील मनात आणि कल्पनेतच.. असे असले तरी कधीही न पाहिलेल्या अनेकानेक गोष्टी रंगांच्या किमयेतून कागदावर उमटविण्याची अंधांची जिद्द मात्र आकाशाएवढी…ह्या दिव्यांग […]

अन्…आमदार हिरामण खोसकर यांच्या डोळ्यांतून वाहू लागल्या अश्रुधारा… हे आहे कारण

भास्कर सोनवणे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ लंगोटी बांधून पोटापाण्यासाठी जीवघेणा प्रवास…पावसाचा कहर झाल्यावरही ओतप्रोत ओसंडून वाहणाऱ्या नदीतून जगण्याचा खडतर प्रवास करणारे बिचारे आदिवासी बांधव….कोणी आजारी पडलं तर पाठीला बांधून खळाळून वाहणाऱ्या नदीतील प्रवास स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचा प्रवास सुरू होण्यापूर्वीचा आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देत नसल्याने निरंतर जीव हातात धरून आदिवासी बांधव वाहणाऱ्या नदीतून प्रवास करीत […]

शिक्षणाची अखंड ज्ञानधारा अतिदुर्गम भागात रुजवणारे आदर्श शिक्षक प्रमोद पांडुरंग परदेशी

लेखन : भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा वाघाच्या तोंडात हात घालावा इतक्या सहजतेने परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून शिक्षणाची अखंड ज्ञानधारा अतिदुर्गम भागात रुजवणारे आदर्श शिक्षक प्रमोद पांडुरंग परदेशी. अवघ्या महाराष्ट्रात दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थी आणि आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी त्यांचा “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” मैलाचा दगड ठरला आहे. दुर्गम दऱ्याकपारीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात सावित्री जोतीच्या अखंड शिक्षणाचा दिवा […]

घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली सर्वात अवघड शस्त्रक्रिया

इगतपुरी तालुक्यातील आतापर्यंतची पहिलीच शस्त्रक्रिया इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ इगतपुरी, घोटी म्हटले की आदिवासी आणि अतिदुर्गम तालुका डोळ्यांसमोर उभा राहतो. साहजिकच इथल्या आरोग्य सुविधा सुद्धा जेमतेम असाव्या अशी सर्वांची धारणा आहे. यामुळेच मोठ्या शहरांकडे आरोग्याच्या विशिष्ठ सुविधांसाठी अनेकजण जात असतात. अशा परिस्थितीत घोटी येथील डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी लोकांची गैरसमजुत दूर केली आहे. घोटीसारख्या शहरातही […]

इगतपुरीच्या तरुणांनी बनवला आदिवासींचे वास्तव मांडणारा लघुचित्रपट

शिव प्रॉडक्शन धनराज म्हसणे प्रस्तुत : “किवटी” – दिशा राजकारणाची हत्या आरक्षणाची इगतपुरीनामा न्यूज, दि. १० स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या मांडणीवर देश उभा राहिला, घडला आणि विकसितही झाला. त्यासाठी अनेक कायदे आले, दुरुस्त्या झाल्या. काही योजना लोकसहभागातुन तर काही कायदे कड़क करून राबविण्यात आले. उद्देश एकच की देशातील सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष व्हावा. समाजाचा कुठलाही घटक वंचित राहता […]

“डेल्टा” विषाणू इगतपुरीच्या उंबरठ्यावर!

इगतपुरीनामा न्यूज दि. ७ : कोरोना विषाणूच्या विळख्यातून इगतपुरी तालुक्याची सुटका होते आहे असे चित्र निर्माण होवू लागले असतांनाच काल अनाहूतपणे डेल्टा विषाणूने तालुक्यात शिरकाव केला आहे. काल आलेल्या अहवालानुसार डेल्टा विषाणूचे नाशिक जिल्ह्यात तीस रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण घोटी शहरातील असल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. आरोग्य यंत्रणेच्या अहवालाने सुध्दा या […]

शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाच्या दुखण्यांकडे कोणी लक्ष देईल का ?

लेखन : भास्कर सोनवणे, संपादक पूर्वापार चालत आलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा आजच्या काळात दिवसेंदिवस ऱ्हास होतो आहे. स्वतंत्र शेतीव्यवसाय आणि स्वतंत्र संसार मांडला जातो आहे. त्यामुळेच वडिलोपार्जित शेत जमीनींची सरसनिरस मानाने वाटप करण्यासाठी सहमती मिळवली जाते. भावा भावांमध्ये ह्या जमिनी एकमेकांना वाटप करण्यासाठी तालुक्याच्या तहसीलदारांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ८५ प्रमाणे अधिकार देण्यात आले […]

इगतपुरी तालुका म्हणजे लोककला आणि शेकडो कलावंतांची फौज घडवणारे विद्यापीठ

लेखन : भगीरथ शिवनाथ मराडे इगतपुरी तालुक्याला मोठा पौराणिक इतिहास लाभलेला आहे. छत्रपती शहाजीराजे, जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर वामनदादा कर्डक, शुरवीर राघोजी भांगरे आदी दिग्गज शुरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इगतपुरी तालुका आहे. सह्याद्रीच्या चित्ताकर्षक डोंगरदऱ्या आणि विविध अंगांनी नटलेल्या इगतपुरी तालुक्याला लोककला आणि कलावंतांची […]

वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला पासून साकुर पर्यंत १६३ शेतजमिनी “समृद्धी” साठी होणार संपादित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ( राज्य महामार्ग ( विशेष ) क्र. २ साठी इगतपुरी तालुक्यातील खासगी जमीन संपादित करण्याचा उद्धेश घोषित करण्याबाबत शासकीय अधिसूचना ११ जूनला शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा भूमी संपादन अधिकारी तेजस चव्हाण यांनी शासन अधिसूचना नाशिकच्या दै. पुढारी ह्या […]

error: Content is protected !!