इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनकडून दरवर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तिमत्वाला दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार जननायक गोरख बोडके यांना घोषित झाला आहे. गोरख बोडके हे सध्या नाशिक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम पाहत असून ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात अव्वल कामगिरी करून जनमानसात मोठ्या कार्याची भरारी घेतली आहे. त्यांच्या विविधांगी कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पूरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी ५ मार्चला पुणे येथे आयोजित केलेल्या पुरस्कार समारंभात देशपातळीवरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने, राज्य महिला उपाध्यक्षा सरिता गाखरे, राज्य सरचिटणीस सुभाष घरत, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, राज्य उपाध्यक्ष जयमंगल जाधव यांनी दिली.
अण्णाभाऊ साठे सभागृह एअरपोर्ट रोड येरवडा पुणे येथे शनिवारी ५ मार्चला सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. गोरख बोडके यांना हा सन्मान मिळाल्याने इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदेश कार्याध्यक्षा आर्कि. अमृताताई वसंत पवार, राज्य उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, भारत (आबा ) शिंदे, सुभाष ( दादा ) पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजी ( आप्पा ) मोरे, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा डॉ. निलम पाटील, अमरावती विभाग अध्यक्ष गोपाळ कोल्हे, नागपुर विभाग अध्यक्षा आवंतिका लेकुरवाळे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.