इगतपुरी तालुक्यातील मानवेढे गाव झाले अतिक्रमणमुक्त, स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ग्राम : शिवजन्मोत्सवाच्या मुहूर्तावर मानवेढे गाव स्मार्ट ग्राम योजनेत ठरणार अव्वल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

ग्रामसमृद्धी साधण्यासाठी गावाचे आरोग्य महत्वाचे आहे. आरोग्य जपण्यासाठी स्वच्छता सुद्धा महत्वपूर्ण आहे. माझं गाव टकाटक, सुंदर आणि स्वच्छ दिसावे, रोगराई आणि आजार दूर पळावेत यासाठी इगतपुरी तालुक्यातील मानवेढे ह्या गावातील गावकऱ्यांनी निश्चय केला आहे. संपूर्ण गाव स्वच्छ आणि कचरामुक्त करून आरोग्यदायी होण्यासाठी आज सगळ्या गावकऱ्यांनी श्रमदान केले. आगामी काही दिवसात मानवेढे हे गाव इगतपुरी तालुक्यातील क्रमांक एकचे स्वच्छ आणि सुंदर स्मार्ट गाव होणार आहे. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी पृथ्वीराज परदेशी, संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे यांनी मानवेढे गावकऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. उपसरपंच भाऊराव भागडे यांच्या संकल्पनेनुसार मानवेढे गावाची वाटचाल स्मार्ट गावाकडे होत आहे. ग्रामपंचायतीच्या साहाय्याने जेसीबी, ट्रॅक्टर आणि इतर साहित्याद्वारे स्मार्ट ग्राम होण्यासाठी बहुमोल मदत झाली. विशेष म्हणजे मानवेढे गावातील विविध अतिक्रमणे काढून गावाचा चेहरामोहरा सुद्धा बदलून टाकण्यात आला. येत्या १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाच्या मुहूर्तावर मानवेढे गाव १०० टक्के स्वच्छ आणि स्मार्ट गाव होत आहे. जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांनी स्मार्ट ग्राम योजनेत मानवेढे गावाला स्थान मिळाल्याने गावकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

मानवेढे गाव अतिक्रमणमुक्त, स्वच्छ, आदर्श, कचरामुक्त, स्मार्ट गाव झाले आहे. हे सर्व होण्यासाठी गावकऱ्यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी अविरत झटत आहेत. शिवजन्मोत्सवाच्या दिवशी संपूर्ण गाव यापुढे स्मार्ट ग्राम म्हणून ओळखले जाईल. मानवेढे ग्रामस्थांनी इगतपुरी तालुक्यातील पहिले गाव स्मार्ट ग्राम बनवले असल्याचा मला अभिमान वाटतो. मानवेढे गावाचा इतर सर्व गावांनीही आदर्श घ्यावा.

- विठ्ठल लंगडे, सभापती पंचायत समिती इगतपुरी

मानवेढे गावकऱ्यांनी आज राबवलेल्या स्वच्छता अभियानात महिला, पुरुष व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गावाचा कानाकोपरा स्वच्छ केला. स्वयंस्फूर्तीने गावकऱ्यांनी श्रमदान करून गावाला आरोग्यदायी करण्याचा विडा उचलेला आहे. गावाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून गवत काढून टाकण्यात आले. जमा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून संपूर्ण कचरा झाडून साफ केला. गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा संकलित करून रस्ते स्वच्छ केले. गावात राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या स्वच्छता मोहिमेत गावातील महिला, युवती, विद्यार्थी, युवक, जेष्ठ नागरिक आणि सर्व ग्रामस्थांनी उल्लेखनीय सहभाग घेतला. महिला बचत गटाच्या महिलांनी ह्याकामी मोठी कामगिरी केली. लोकनियुक्त सरपच  मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव भागडे, माजी सरपंच फुलचंद वीर, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव भागडे, माजी सदस्य गोरख भागडे, तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास भागडे, शालेय समिती अध्यक्ष गणपत भागडे, उपाध्यक्ष रतन भागडे, ग्रामपंचायत सदस्य गणपत तात्यापाटील भागडे, सदस्य वच्छला भागडे, शिक्षक प्रकाश सोनवणे, खैरनार सर, पवार सर, आरोग्यसेविका चारूशीला गोसावी, सोनवणे सर आशा सेविका अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक गुलाब साळवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!