नसानसात जनसेवा भिनलेला टाकेद परिसराचा “भगवान” :
आदिवासींचा पाठीराखा, युवकांचा लाडका बिगबॉस, वारकऱ्यांचा कैवारी आणि सामान्य नागरिकांना आधार

भगवान खंडू जुंदरे

भगवान खंडू जुंदरे. निर्व्यसनी जीवन जगणारा कष्टकरी, वनवासी, आदिवासींचा पाठीराखा, युवकांचा लाडका बिगबॉस, वारकऱ्यांचा कैवारी आणि सामान्य नागरिकांना आधार देणारा भाऊ. इगतपुरी तालुक्यातील टाकेद आणि खेड परिसरात शेकडो कुटुंबांच्या घराघरांत प्रेमाने, आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे भगवान जुंदरे. जनसेवा नसानसात भिनलेल्या भगवान जुंदरे यांनी उभे केलेले सेवाकार्याचे सामर्थ्य इगतपुरी तालुक्यात अभूतपूर्व आहे. शिळी भाकरी खाऊन जीवन जगणाऱ्या शेकडो लोकांना भक्कमपणाने उभे करणारे भगवान जुंदरे यांचे कल्याणकारी नेतृत्व चांगलेच बहरत आहे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा पाहता इगतपुरी तालुक्यातील उदयोन्मुख आणि विकासाचे वलय लाभलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या तेजांकित सामर्थ्याने अधिकाधिक भरारी घेईल ह्यात अजिबात शंका नाही. छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेले सामाजिक कार्य जनमानसात प्रेरणादायी ठरले आहे.

इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक ह्या गावात अंगमेहनत करणाऱ्या कष्टकरी शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी भगवान जुंदरे यांना लाभली. अध्यात्मिक कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबाने त्यांना दिला. कोणताही ऋतू असला तरी पहाटेच नदी अथवा विहिरीवर जाऊन आंघोळ करणारा हा युवक इगतपुरी तालुका तालीम संघाचा उपाध्यक्ष आहे. गावासह टाकेद परिसरातील गरिबांचं, शोषितांचं आणि व्यवस्थेने नाकारलेल्या लोकांचं दुःख लहानपणापासून त्याने पाहिलं. यामुळेच सर्वसामान्य नागरिकांच्या अन्यायाविरोधात भगवान जुंदरे नावाचे अनोखे व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्याला मिळाले. गावकऱ्यांच्या आग्रहाखातर ग्रामपंचायत सदस्यपदी त्यांना विजय मिळाला. त्याद्वारे त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने सुरू झालेली जनसेवा ह्या परिसरातील थेट लोकांच्या घराघरात जाऊन पोहोचली. भगवान जुंदरे म्हणतात की, प्रत्येक माणसात वसलेला परमेश्वर माझ्या हातून सेवा करून घेतो आहे. मी मिळवून दिलेला न्याय, हक्क, आधार आणि लोकांमध्ये पेरलेली हिंमत यामुळे सामान्य माणसाची छाती अभिमानाने फुलून उठते. हे पाहतांना आईवडिलांच्या पुण्याईमुळे काम केल्याचे सार्थक मला आनंद देऊन जाते.

ज्या माणसाकडे भरपूर आहे त्याने त्याग करणं वेगळं पण सामान्य आर्थिक परिस्थिती आणि शेतीवर गुजराण करणाऱ्या भगवान जुंद्रे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने मदत कार्यात भरभरून साहाय्य करणं वेगळं. कोरोना काळात रुग्णसेवेसाठी त्यांनी २४ तास सक्रिय राहून विनामोबदला आपले वाहन सक्रिय ठेवले होते. त्या काळात अनेक महिने त्यांनी लोकांना मदतकार्य केले. रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनेकांचे प्राण वाचवायला त्यांनी मदत केली. गावोगावी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन विविध बक्षिसे, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, नव्या खेळाडूंना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. सर्वतीर्थ टाकेद येथे येणाऱ्या वारकरी दिंड्या, दशक्रिया विधी आणि विविध प्रासंगिक कार्यासाठी अन्नदान द्यायला ते नेहमीच तत्पर असतात. आदिवासी वाड्यापाड्यांवर जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था पाहून स्वखर्चाने दुरुस्ती, छोट्या छोट्या मोऱ्या आणि व्यक्तिगत लाभाच्या योजना त्यांच्या नियोजनातून साकारल्या गेल्या. लग्नकार्यासाठी गरिबांना साहाय्य करतांना त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. ह्या भागातील प्रत्येक माणसासाठी भगवान जुंदरे यांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य अद्वितीय आहे. 

टाकेद परिसरातील अल्पशिक्षित, अशिक्षित, असंघटित आणि सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी २४ तास कार्यरत राहणारे भगवान जुंदरे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. लोकांचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी जोरकसपणे लढत राहणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. आपल्या स्वतंत्र विचारसरणीच्या बळावर स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करून खाचखळग्यांची, काट्याकुट्यांची पर्वा न करता समाजाच्या उद्धारासाठी, लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भगवान जुंदरे यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. सामान्य माणसाच्या वेदना जाणणारे भगवान जुंदरे म्हणजे टाकेद भागातील लोकांच्या मनातला विश्वास आणि कुशल नेतृत्व करण्यास सिद्ध असणारे अजब रसायन आहे. आगामी काळात लोकांच्या आशीर्वादाची अपरंपार शक्ती घेऊन भगवान जुंदरे यांना कौशल्यदायी नेतृत्व करण्यासाठी निश्चितच संधी मिळेल असा विश्वास वाटतो.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!