इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नगर परिषदेच्या तलावात मेलेले तरस आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या चार दिवसांपासून तलावात तरस पडले असल्याचा लोकांचा कयास आहे. या प्रकारामुळे इगतपुरी नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर चव्हाट्यावर आला आहे. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर नगरपरिषदेचे जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी राहत असूनही मेलेले तरस आढळले. याच […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या सुचनेनुसार इगतपुरी आणि घोटी ग्रामीण रुग्णालयात शालेय नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील 74 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील 57 विद्यार्थ्यांध्ये दृष्टीदोष असून चष्म्यासाठी संदर्भित करण्यात आले. त्यांना 3 डिसेंबरला चष्मे वाटप होणार आहेत. 17 विद्यार्थ्यांमध्ये तिरळेपणा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 19 ग्रामपंचायत वाडीवऱ्हे येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इगतपुरी तालुका संपर्क अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली, सार्वजनिक शौचालय उदघाटन, वैयक्तिक शौचालय भेटी, शाळेची शौचालय पाहणी, जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छता रन, पथनाट्य, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम ग्रामीण आदिवासी भागातील महिलांनी मधमाशी पालनातून उत्पादीत केलेल्या अस्सल मधाचा गोडवा नाशिककरांना चांगलाच भावला आहे. जीवनसंवर्धक मधमाशी पालन करून जंगली तुळस आणि जांभूळ झाडांमधून मिळवलेले मध नाशिक येथील प्रदर्शनात विक्रीला ठेवण्यात आले आहे. नाशिककर नागरिक आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांनी ह्या अस्सल मधाची जोरदार खरेदी केली. शबरी आदिवासी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 12 मनात सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिटयूटमध्ये आला. कोपरगाव येथील ८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येथील कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका मारत […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ अनेक व्याप, धावपळीचे जीवनमान, चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही संभाव्य आजारांना रोखण्यासाठी कोणीही आपल्या बहुमोल आरोग्याची तपासणी करीत नाही. परिणामी इगतपुरी तालुक्यात अनेकांना अचानक ह्या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे दिसते. ह्या अघटीत घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीराची तज्ञांकडून योग्य […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 3 नाशिक जिल्हा हिवताप निर्मूलन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय रामू राव आणि व्हॉइस चेअरमनपदी उषा भारत देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली मैद यांनी बिनविरोध निवडीची घोषणा करताच सभासद आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांची अतिशय जिव्हाळ्याची समजली जाणारी ही पतसंस्था प्रमुख अर्थवाहिनी आहे. नुकत्याच झालेल्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील 1 जण नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यूमुखी पडला. सक्रू शंकर मेंगाळ वय 47 असे त्यांचे नाव असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जुलाब आणि उलट्या झाल्यामुळे हा मृत्यू झाला असल्याची चर्चा गावात सुरु आहे. अनेक नागरिकांना […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 16 इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील 15 पेक्षा अधिक नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध हॉस्पिटलमध्ये ह्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. घोटी, नाशिक येथील खाजगी रुग्णालयांमध्ये काही नागरिक उपचार घेत आहेत. एकाच वेळेस पंधरा ते वीस जणांना […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 29 इगतपुरी शहरातील श्री साई सहाय्य समिती, प्रभुनयन फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने रकबी द फर्न हॉटेल येथे कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न झाला. राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. एसएमबीटी रुग्णालयाचे डॉ. संतोष पवार, डॉ. सुरज कडलग, संतोष भोसले, रफिक […]