इगतपुरीनामा न्यूज – आदर्श गाव मोडाळे येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या प्रयत्नांतुन मिळालेल्या ई घंटागाडीचे लोकार्पण आज करण्यात आले. या प्रकारच्या २ घंटागाड्या घेण्यात आल्या असून एका गाडीचा प्रातिनिधिक स्वरूपात गोरख बोडके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मोडाळेच्या विकासासाठी ओळखले जाणारे गोरख बोडके यांच्यामुळे गावाचे विविध प्रश्न सुटले असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र दिनी स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांच्या संकल्पनेतून घोटी ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते यांनी स्वराज्यचे आभार मानले. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर स्वराज्य संघटना काम करीत असून आरोग्य क्षेत्रातही संघटनेचे मोठे योगदान आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – सलाम मुंबई फाउंडेशन, एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या मार्फत गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखू मुक्त शाळांचा इगतपुरी तालुका हा कार्यक्रम इगतपुरी पंचायत समितीमध्ये संपन्न झाला. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी तंबाखू मुक्त शाळांचा इगतपुरी तालुका घोषित करून शिक्षण विभागाचे कार्य कौतुकास्पद आहे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक तज्ञ मार्गदर्शक संजय येशी यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, कुऱ्हेगाव येथील अंगणवाड्यांची पाहणी इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांनी केली. याप्रसंगी पोषण आहाराचे साहित्य वाटप करण्यात आले. नियमित सकस आहार घेतल्याने शरीराचे पोषण होते. चुकीच्या आहारामुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागते. उत्तम आरोग्यासाठी दररोज संतुलित आहार घेणे गरजेचे असल्याचे बालविकास प्रकल्पाधिकारी वाकडे यांनी सांगितले. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – २५० किलोमीटरचा प्रवास करीत “साईनाथ महाराज की जय”चा जयघोष करीत मुंबई येथून निघालेल्या साई भक्तांच्या पदयात्रेचे इगतपुरी येथील शिवाजी नगर येथे श्वेता पवार यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. तीस वर्षांपासून मुंबईच्या ओम श्री साई सेवक मंडळातर्फे रामनवमी निमित्त दरवर्षी शिर्डी पदयात्रेचे आयोजन केले जाते. रामनवमी महोत्सवाच्या दिवशी साईबाबांच्या चरणी सेवा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – रामनवमी निमित्त मुंबई ते शिर्डी मार्गावर मोठ्या संख्येने साई पालख्यांचे आगमन होत आहे. यामुळे इगतपुरीजवळील महामार्ग साई भक्तांमुळे फुलून निघाला आहे. मुंबई लालबाग येथील मानाच्या साईलीला पालखीचे कसारा घाट चढल्यानंतर इगतपुरी येथील सह्याद्री नगर दत्त मंदिरात आगमन झाले. या पालखीने विसावा घेतल्यानंतर साई भक्तांसाठी प्रभू नयन फाउंडेशन, श्री साई सहाय्य […]
शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी वाडीवऱ्हे येथे शेतकरी महिलांकडून भाजीपाला खरेदी करीत महिलांचा सन्मान केला. यावेळी त्यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तुमच्यामुळे कुटुंबाचे अस्तित्व असून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी महिलांना दिला. त्यांच्या या अनोख्या कार्याचे ग्रामीण भागातील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त नैसर्गिक किंवा जैविक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. यासाठी भविष्यकालीन आरोग्यविषयक समस्या टाळाव्यात यासाठी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सॅमसोनाईट कंपनी सध्या कार्य करत आहे. या उपक्रमांतर्गत रायांबे ह्या गावात ४५ शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळ खताच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – अस्सल गावरान आणि जंगली भागातले विश्वसनीय मध प्रत्येक जाणकार व्यक्तीला हवे असते. इगतपुरीसारख्या अतिदुर्गम तालुक्यातील जंगलामधून संकलित केलेले मध तर अतिशय लोकप्रिय आहे. नाशकातील विविध ठिकाणच्या प्रदर्शनात ह्या मधाला नागरिकांनी अव्वल दर्जा दिलेला आहे. पर्यटननगरी संबोधल्या जाणाऱ्या इगतपुरीत ह्याच जंगली मधाची मुबलक उपलब्धता झाली आहे. HBB सह्याद्रीच्या रानमेवा ह्या दुकानात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – तैनवाला फाउंडेशन व रेडिओ विश्वास यांच्या सहकार्याने डॉ. अर्पित शहा श्रीराम आय क्लिनिक नाशिक यांच्या कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामडकीवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. यावेळी विद्यार्थी व संपूर्ण ग्रामस्थांचे मोफत डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरात मोतीबिंदू दोष असलेल्यांना मोफत ऑपरेशनसाठी सुविधा देण्यात […]