
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आपल्या आदर्श आणि सेवाभावी कार्याने सुपरिचित असणारे कुमारशेठ चोरडिया यांची इगतपुरी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सार्थ निवड करण्यात आली आहे. मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ही निवडीची घोषणा करून नियुक्तीपत्र दिले. यावेळी नाशिक जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहेर, उपाध्यक्ष गणेश निकम, अतुल आहेर, गोरख चौधरी, सुरेश पाटील, अतुल जाधव, किरण छाजेड, योगेश बागरेचा उपस्थित होते. वैद्यकीय सेवेत कायमच सर्वोत्तम सहकार्य आणि योगदान देणारे कुमारशेठ चोरडिया यांच्या निवडीने असोसिएशनला दमदार अध्यक्ष लाभला असल्याची प्रतिक्रिया इगतपुरी तालुक्यात व्यक्त होत आहे. सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाभर नामांकित असणाऱ्या घोटीतील मातोश्री हॉस्पिटलच्या यशस्वी झालेल्या अनेक किचकट शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी कुमारशेठ चोरडिया यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अध्यक्षपदामुळे मातोश्री हॉस्पिटलला अभिमान वाटतो अशी भावना मातोश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी व्यक्त केली. हॉस्पिटलचे कर्मचारी विनोद बल्लाळ, मनीषा शिंदे, रामदास गव्हाणे, अरुण मलगे, जयेश बैरागी, दीपाली शेंडे, नामदेव खादे, निशा खाडे, रमेश तेलम, रामा गव्हाणे यांनी त्यांचा निवडीबद्धल सन्मान केला. मेडिकल असोसिएशनचे सदस्य रामदास गव्हाणे, मेहुल शाह, पारस चोरडिया, देवचंद काळे, महेंद्र इंदनिया, विकास सिंगल, डॉ. वालचंद चोरडिया, उमेश हेमके, श्रीकांत काळे, महावीर मुथा, वैभव गोऱ्हे, मतीन शेख, राजू उदावंत आदींनीही कुमारशेठ चोरडिया यांचा भव्य सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
