
इगतपुरीनामा न्यूज – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो सेवा केंद्र येथील कै. दत्तात्रय सहदेव ठमके वय ८४ यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे ७५ वे मरणोत्तर देहदान आहे.धामणगाव येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाला कुटुंबियांनी कै. दत्तात्रय सहदेव ठमके यांचा देह सुपूर्द केला. याप्रसंगी पत्नी सुमित्रा दत्तात्रय ठमके, मुलगी अनिता विष्णुदास भागडे, वनिता दुष्यन्त लहाने, सुनीता दिनकर धारे, पौर्णिमा प्रकाश भागडे, नंदिनी भानुदास भागडे, दर्शना ऋतिक कडू, जावई विष्णुदास धोंडीराम भागडे, दुष्यन्त बबन लहाने, दिनकर लक्ष्मण धारे, प्रकाश चंदुलाल भागडे, भानुदास संतु भोर, ऋतिक गंगाधर कडु, तालुका सेवा समिती इगतपुरी, जिल्हा सेवा समिती नाशिक, स्व स्वरुप संप्रदायाचे भक्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते. एसएमबीटीचे सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. जगद्गुरू श्रींनी त्यांच्या संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळून तसे अर्ज संस्थांनकडे दिले. त्यांनी ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यातील ७५ जणांनी आत्तापर्यंत मरणोत्तर देहदान केले आहे. गुरूंवरील निष्ठा आणि गुरुंवरील प्रेम यामुळेच जगद्गुरुश्रींचे अनुयायी मरणोत्तर देह दान करत आहेत.