इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम धामडकीवाडी येथे प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विविध आजारावर नि:शुल्क चिकित्सा शिबीर आणि वैद्यकीय उपचार करण्यासाठी फाउंडेशनच्या आरोग्य पथकाने परिश्रम घेतले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनुश्री मुखर्जी, डॉ. प्रसाद देसाई, संस्थापक सदस्य शशिकांत मुखर्जी यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत स्वच्छतेचे निरोगी आयुष्यासाठी महत्व सांगण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, नवसाक्षरता अभियान अंतर्गत सुरु असलेल्या वर्गातील नवसाक्षरांना व सर्व धामडकीवाडीच्या ग्रामस्थांना मोफत औषधे वाटप करण्यात आले.
प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशन हे अनेक वर्षांपासून आदिवासी वाड्यापाड्यांवर गोरगरीब जनतेसाठी आरोग्य शिबीरे आयोजन करत असते. आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय उपचार घेऊ शकत नाही अशा लोकांसाठी मोफत आरोग्य शिबीरे घेऊन मोफत औषध वाटप केली जातात. कार्यक्रमाप्रसंगी धामडकीवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, डॉ. मनुश्री मुखर्जी, डॉ. प्रसाद देसाई, शशीकांत मुखर्जी, बबन आगिवले, गोकुळ आगिवले, खेमचंद आगिवले, भारत आगिवले, लहानु आगिवले, लुखा भगत, गंगाराम तेलम, यशवंत आगिवले, वाळु आगिवले, चांगुणा आगिवले, साळीबाई आगिवले, लक्ष्मीबाई आगिवले, मिराबाई आगिवले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.