पेन्शनच्या एल्गारसाठी भारत छोडो यात्रा आज नाशकात : राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या उपस्थितीत होणार सभा

इगतपुरीनामा न्यूज – राज्यात मागील काही वर्षांपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी प्रचंड मोठे आंदोलन उभे राहिले आहे. मार्चमध्ये झालेल्या राज्यव्यापी संपानंतर सदर मागणीने आणि संघटनेने रौद्ररूप धारण केले आहे. जुनी पेन्शन बंद करून  देण्यात येणारी नवीन पेन्शन स्कीम अर्थात एनपीएसच्या विरोधासाठी एनएमओपीएस राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या नेतृत्वाखाली बिहार येथील चंपारण येथून १ जून पासून एनपीएस […]

जीर्ण पोल आणि लोंबणाऱ्या तारा तातडीने बदला अन्यथा आंदोलन करण्याचा स्वराज्य संघटनेचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी  जीर्ण झालेले विद्युत पोल आणि लोंबकळणाऱ्या तारा जीवघेण्या ठरत आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. जीर्ण झालेले पोल व वितरण व्यवस्था बदलण्याची गरज असून अधिकारी फक्त टोलवाटोलवी करत असल्याची सध्या परिस्थिती आहे. मंडळाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष […]

पाणीप्रश्नासाठी बलायदुरीच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश : पंचायत समितीकडून तातडीने उपाययोजना करून प्रश्न सुटणार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे गेल्या अनेक महिन्यापासून ग्रामस्थांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. यामुळे आज सकाळी गावातील महिला, युवती आणि ग्रामस्थ यांनी हंडा मोर्चा काढला. बलायदुरी गावापासून निघालेल्या हंडा मोर्चाची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. तातडीने याप्रकरणी योग्य त्या सर्व उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न […]

८ दिवसात अस्वली जानोरी पुलाच्या कामाला गती देऊन प्रश्न सोडवू : पुलाखालील बिऱ्हाड आंदोलकांना अधिकाऱ्यांकडून लेखी पत्र : संतोष गुळवे यांच्या नेतृत्वाखाली त्रस्त शेतकऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन मागे

इगतपुरीनामा न्यूज – जानोरी अस्वली रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम एका आठवड्यात तातडीने पूर्ण करून ह्या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू असे आश्वासन इगतपुरीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ च्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिले. त्यामुळे ह्या पुलाखाली आज सकाळी सुरु झालेले बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्यात आले. बेलगाव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष सुखदेव गुळवे यांच्या नेतृत्वाखाली हे […]

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणा : संबंधितांवर कारवाईसाठी इगतपुरी तालुका समता परिषदेचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी […]

पुलाचे काम पूर्ण करा अन्यथा वाहणाऱ्या पाण्यात आम्हालाही वाहून जाऊ द्या : अस्वली जानोरी भागातील त्रस्त शेतकरी कुटुंबांचे उद्या आक्रमक आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडलेले आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्या येण्याचे प्रचंड हाल सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी वळसे घालून फेरा मारावा लागतो. परिणामी शेतीच्या उत्पन्नावर सुद्धा मोठा दुष्परिणाम झालेला आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्या रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत अनेक […]

माननीय आमदार खोसकर साहेब, अस्वली जानोरी पुलाखाली बिऱ्हाड आंदोलनाला या…! पूल पूर्ण करा अथवा आम्हाला वाहून तरी जाऊद्या :

दीड वर्षांपासून त्रस्त शेतकरी कुटुंबांची भावनिक साद इगतपुरीनामा न्यूज – माननीय आमदार हिरामण खोसकर साहेब, अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडलेले आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्या येण्याचे प्रचंड हाल सुरु आहेत. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत कुटुंबासह पुलाखाली आम्ही मुक्काम करून बिऱ्हाड आंदोलन करणार आहोत. […]

महिलेवर अत्याचार करून झालेल्या निर्घृण खूनाच्या निषेधार्थ घोटी शहरात उत्स्फूर्त मोर्चा : नराधमांना फाशी देऊन भगिनीला न्याय देण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात महिलेवर झालेला अत्याचार व खूनाच्या घटनेच्या निषेधार्थ घोटी शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे पीडित महिलेला श्रद्धांजली वाहण्यात आली. घोटी शहरात उत्स्फूर्तपणे काढण्यात आलेल्या मोर्चात महिलांसह तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. संबंधित पीडित महिला अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिच्या अखंड कुटुंबाचा उदरनिर्वाह तिच्यावर अवलंबून होता. अशा गरीब महिलेवर […]

महामार्ग प्रशासनाच्या निषेधार्थ पाडळी देशमुखचे धांडे कुटूंब उद्या महाराष्ट्र दिनी करणार सामूहिक आत्मदहन : वर्ष उलटूनही आश्वासन पाळले नसल्याने घेतला टोकाचा निर्णय

इगतपुरीनामा न्यूज – पाडळी देशमुख येथील गट नंबर ४२२ मधील काही क्षेत्र महामार्गासाठी संपादित आहे. या क्षेत्रातील बांधलेले व्यापारी गाळे पाडण्याचे आश्वासन महामार्ग प्रशासनाने दिले होते. त्यावर एक वर्षानंतरही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाडळी देशमुखचे धांडे कुटुंबिय १ मे महाराष्ट्र दिनी इगतपुरीच्या तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, […]

लढा सामान्य इगतपुरीकरांसाठी – विविध मागण्यांसाठी इगतपुरीत नगरपरिषदेसमोर जागृत नागरिकांचे आमरण उपोषण : आजचा दुसरा दिवस ; इगतपुरीकरांचा वाढतोय पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्या या मागणीसाठी इगतपुरी येथील जागृत नागरिक समितीचे जेष्ठ नागरिक पुरणचंद लुणावत, किरण फलटणकर, अजित पारख, विशाल चांदवडकर, विलास कदम यांनी इगतपुरी नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज ह्या उपोषण आंदोलनाचा दुसरा दिवस असून या उपोषणाला सर्वपक्षीयांसह शहरातील सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. इगतपुरी शहर […]

error: Content is protected !!