निवडणूक आयोग आणि ईव्हीएमविरोधात लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीत काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोग आणि ईव्हीएमविरोधातील लढा सुरूच ठेवला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदिवासी सेलचे नेते लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज इगतपुरी तहसीलदार कार्यालयात निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुक आयोगाच्या मदतीने घोटाळा केला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही. राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही अशी जनभावना निर्माण झाली असून मतदान मतपत्रिकेवरच घ्यावे, अशी मागणी जनतेतूनच येत आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे, निवडणूका या निष्पक्ष, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पाडल्या पाहिजेत असा लकीभाऊ जाधव यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी व मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने आज राष्ट्रीय मतदार दिनी इगतपुरीत निषेध आंदोलन केले. तहसीलदारांना निवेदन देऊन इगतपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आलेल्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इगतपुरी रामदास धांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आकाश पारख, पंढरीनाथ बऱ्हे, निवृत्ती कातोरे, मधुकर धांडे, सत्तार मणियार, अरुण भोर, इस्माईल शेख, रितेश पराडे, अजिंक्य सोनवणे, ऋषी सोनवणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Similar Posts

error: Content is protected !!