काँग्रेस संपली हे दिवास्वप्न !

– पुरुषोत्तम आवारे पाटील, दै. अजिंक्य भारत, अकोला पाच राज्यांच्या निवडणुकांचा नुकताच जो निकाल लागला त्यात काँग्रेसचा जो सफाया झाला त्यामुळे काँग्रेसी चिंतेत तर इतर पक्ष मोठ्या आनंदात आहेत. भाजपच्या तर अगदी गाव पाळीवरील कार्यकर्त्याला काँग्रेसमुक्त भारत झाल्याचे दिवसा भास होत आहेत. इंदिरा गांधींच्या पराभवानंतर काँग्रेसचा चढउतार ज्यांनी अभ्यासला असेल त्यांना या पडझडीचे काहीही वाटत […]

महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अधिवेशन नेमके कशासाठी ? : शिक्षक बांधवांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून

लेखन : निवृत्ती यशवंत नाठे, संपर्क 9921468812 लेखक नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष असून शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांचा दीर्घ अभ्यास आहे. ह्या लेखातील प्रत्येक शब्द आणि वाक्ये अतिशय महत्त्वाची असून राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांवर बहुमोल उत्तरे ह्यातून मिळतील. महाराष्ट्रामध्ये प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन  शिक्षकांच्या संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही प्राथमिक […]

शिवरायांची आरती करू नका…!

लेखन : विनोद नाठे, शिवचरित्र व्याख्याते, 9890979097 काल एका लग्नाला गेलो होतो. तिथे चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली ! शिवराय पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा आहेत देव नाही ! शिवरायांला देव म्हणून त्यांचे महत्त्व कमी करु नका ! त्यांना देव बनवू नका ! त्यांचे दैवती करण करू नका. त्यांचे दैवती करण झाले तर त्यांचा पराक्रम चमत्कार […]

कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघजी लोखंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त

संकलन :- उत्तमबाबा गांगुर्डे, अध्यक्ष नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन महाराष्ट्राला सत्यशोधक विचारवर्तनाचा वारसा देणारे महात्मा जोतिराव फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे नाव आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे त्यांना सार्थपणे म्हटले जाते. १८७० नंतरच्या कालखंडात मुंबईतील गिरणी उद्योगात होत असलेल्या भरभराटीने मँचेस्टरच्या गिरण्यांचे […]

कार्यकुशल बंधू – नामदार बाळासाहेब थोरात साहेब…!

लेखन : सौ. दुर्गा सुधीर तांबे, मा. नगराध्यक्षा संगमनेर, संपर्क ९८२२५५३२५४ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगामधील “अकोले” तालुक्यातील कळसुबाईच्या कुशीत उगम पावणार्‍या अमृतवाहिनी “प्रवरा” नदीच्या तीरावर संगमनेर तालुक्याच्या पूर्वेला “जोर्वे” हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरा आहे. श्री क्षेत्र दत्त महाराजांचे पुरातन मंदिर प्रवरा नदीच्या काठावर आहे. जोर्वे […]

कधी अन् कुठेही प्या..!

– पुरुषोत्तम आवारे पाटील, संपादक, दै. अजिंक्य भारत दारूबंदीची मागणी करणारे महिलांचे उठाव गेल्या काही वर्षात वाढले आहेत. या धंद्यातून दरवर्षी मिळणारा 20 हजार कोटींचा महसूल बुडेल की काय ? अशी भीती वाटणार्‍या राज्य सरकारने त्यावर आपल्या सुपीक डोक्यातून उत्तम शक्कल काढत आता मॉल आणि किराणा दुकानात पण वाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. […]

अंधांची दृष्टी : लुई ब्रेल जयंती निमित्ताने..

संकलन : बाप्पा गतीर, विशेष शिक्षक, पंचायत समिती इगतपुरी लुई ब्रेल लुई ब्रेल जगातील अनेक व्यक्तींमध्ये स्वतःचे स्थान आहे. त्यांनी जगातील दृष्टीहीन(श्राव्य अध्ययन शैली) लोकांना जी भेटवस्तू दिली त्याबद्दल दृष्टीहीन(श्राव्य अध्ययन शैली) युगानुयुगे त्यांचे ऋणी राहतील. लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी एका गरीब फ्रेंच कुटुंबात झाला. त्याचे वडील, मिस्टर सायमन ब्रेल, पॅरिसपासून […]

❝ ती आई होती म्हणूनी, घनव्याकुळ मी ही रडले ❞

डॉ. सौ. दीप्ती देशपांडे, प्राचार्या, एसएमआरके महिला महाविद्यालय, नाशिक ३० नोव्हेंबरला दुपारी ३:५५ मिनिटांनी माझी माय अर्थात आई डॉ. सौ. सुनंदाताई गोसावी हिने ह्या जगाचा निरोप घेतला. आपली आई आता या जगात नाही, हा विचारच मन स्वीकारत नव्हतं. खरं तर वार्धक्य, मरण हे कुणाला चुकत नाही. तुकोबाही म्हणतात त्याप्रमाणेच तुका म्हणे एका मरणची सरे , […]

“तो” व्हिडिओ इगतपुरीचा नाही!

इगतपुरीनामा न्यूज दि. ०१ : आज दिवसभर सोशल मीडिया मध्ये एक गारपिटीचा व्हिडिओ शेअर केला जातो आहे. बऱ्याच ठिकाणी तो व्हिडिओ इगतपुरीचा असल्याचा उल्लेख केला जातो आहे. आम्ही वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की तो व्हिडिओ इगतपुरीचा नाही. पुन्हा एकदा सर्वांनी ध्यानात घ्यावे, तो व्हिडिओ इगतपुरीचा नाही. सध्या सगळीकडेच पाऊस सुरू आहे, त्यामुळे गारपीट होवू […]

एकच मिशन जुनी पेन्शन : पेन्शन हक्क संघटनेचा एल्गार

इगतपुरीनामा न्यूज दि. 24 पेन्शनच्या व्यापक जनजागृतीसाठी 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात पेन्शन संघर्ष यात्रेचे संयोजन महाराष्ट्र राज्य जि प कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केले आहे. आज 23 नोव्हेंबरला संघर्षयात्रा नाशिक येथे आली होती तिची भव्य सभा आज दिंडोरी येथे झाली. नाशिकमधील सर्व तालुक्यांतील पेन्शन फायटर्स विक्रमी संख्येने या […]

error: Content is protected !!