– भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा
राजकारण म्हटलं की त्याची सूत्रे, गणिते आपण सर्वजण जाणतोच. पण इतर वेळी जनतेकडे फिरकूनही न बघणारे राजकारणी निवडणुका जवळ येताच कशा पद्धतीने हालचाली करतात. अशा आशयाचा लघुपट समाधान मुर्तडक आणि त्यांच्या टीमने तयार केला आहे. येत्या काही दिवसात हा लघुपट यु ट्युबवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सर्वांनी आवर्जून पहावा असा हा लघुपट आहे.
निवडणुकीच्या वेळी तयार होणारे वातावरण या लघुपटात दाखविण्यात आले आहे. या लघुपटाद्वारे कुणावर टीका करायची नसून संविधानाने दिलेला पवित्र अधिकार मतदानाबद्दल जनजागृती हा मुख्य उद्देश आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समाधान मुर्तडक यांनी केले आहे. छायांकन सुफियान शेख, हेमंत बैरागी आणि संकलन अमोल कदम यांनी केले आहे. या लघुपटात प्रतिक वडनेरे, अर्चना कडाळे, प्रविण जाधव, विकास जुवेकर, समाधान मुर्तडक, गौरी जामघरे, भुवनेश गोसावी आदी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजोपयोगी काम केल्याने नक्कीच ते जनतेपर्यंत सहजपणे पोहचवता येते असे संपूर्ण टीमचे मत आहे. खालील लिंकवर क्लिक करून लघुपटाची संक्षिप्त माहिती मिळेल. यासह चॅनेल सबस्क्राईब करावा.
खालील लिंकवर लघुपटाची माहिती उपलब्ध आहे.