इगतपुरीनामा न्यूज दि. ०१ : आज दिवसभर सोशल मीडिया मध्ये एक गारपिटीचा व्हिडिओ शेअर केला जातो आहे. बऱ्याच ठिकाणी तो व्हिडिओ इगतपुरीचा असल्याचा उल्लेख केला जातो आहे. आम्ही वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की तो व्हिडिओ इगतपुरीचा नाही. पुन्हा एकदा सर्वांनी ध्यानात घ्यावे, तो व्हिडिओ इगतपुरीचा नाही.
सध्या सगळीकडेच पाऊस सुरू आहे, त्यामुळे गारपीट होवू शकते अशी शक्यता गृहीत असणे साहजिक आहे, मात्र सदर व्हिडिओ हा इगतपुरीचा तर नाहीच, पण आज घडलेल्या घटनेचाही नाही. कदाचित यापूर्वी झालेल्या गारपिटीच्या घटनेचा तो व्हिडिओ असू शकतो, पण निश्चित ठिकाणाची माहिती उपलब्ध नसल्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आम्ही करत आहोत. सतर्क रहा, सुरक्षित राहा.