पायी हळूहळू चाला..मुखाने नरेंद्रनाथ बोला !! – इगतपुरी ते कावनई जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज पायी दिंडी सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज –  इगतपुरी येथील राममंदिर ते कपिलधारा तीर्थ कावनई येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पायी दिंडी आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी जनम प्रवचनकार बिपिन नेवासकर, मोहन महाराज कुलकर्णी यांनी गुरुमाऊली यांचा संदेश आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित भाविकांना समजून सांगितला. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याची महती सांगून त्यांनी उपस्थितांना विविध प्रकारे मार्गदर्शन केले. ह्या सत्संगानिमित्त सकाळी […]

संजीवनी आश्रमशाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी आश्रमशाळेत आज आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेपासून पायी दिंडी काढत तळेगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचलेखैरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे […]

तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, स्वप्नात सुद्धा कोणाचे वाईट चिंतू नका – बिपीन नेवासकर : वाडीवऱ्हे येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज सत्संग सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – ‘अज्ञानातून तरुन जायचं असेल तर साधूची संगतीच उपयुक्त ठरु शकते. साधु-संत हे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणार्‍या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असं सांगताना तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार । मन निरंतर जागविती ॥ असे आपल्याला सांगतात. अत्यंत प्रेमळ संत आपल्याला क्षणोक्षणी सांभाळत, सावरत असतात. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. […]

धामणगाव येथे मंगळवारी १६ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताह

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे  रामनवमी व हनुमान जन्मोत्सत्व तथा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवानिमित्त मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा घुले, वै. पोपट महाराज गाजरे यांच्या आशीर्वादाने मंगळवार १६ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला गायक, वादक, भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळीनी केले आहे. देवराम महाराज गायकवाड, जगदीश […]

लोहशिंगवे येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

इगतपुरीनामा न्यूज – विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्णमहोत्सव व जगदगुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्ताने नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या आशीर्वादाने, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे, जगद्गुरू तुकाराम महाराज गुरुकुलचे हभप ज्ञानेश्वर महाराज तुपे यांच्या मार्गदर्शनाने उद्या मंगळवार ९ एप्रिल पासून अखंड […]

घोटी शहर झाले नवचैतन्यमय ; श्रींच्या मूर्तींची मिरवणूक, पुष्पवृष्टी, जलाभिषेक आणि घरोघरी रांगोळ्या : ७ एप्रिल पर्यंत होणार मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

इगतपुरीनामा न्यूज –  घोटी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहन सोहळ्यानिमित्त मंगळवारी शहरातून श्रींच्या मूर्तीची  सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घोटीतील नागरिक आपली दुकाने बंद ठेऊन या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले होते. संपूर्ण शहर रांगोळीने सजवण्यात येऊन या मिरणुकीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने […]

संस्कृतीरक्षक विवाह सोहळा – वारकरी अन धारकरी यांच्यासोबत नवरी नवरदेवही नृत्यात रंगले : प्रेरणादायी विवाह सोहळ्याचा सर्वांपुढे आदर्श

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – सध्याचे विवाह सोहळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडणारे ठरत आहेत. अनाठायी बाबींवर होणारे खर्च, कर्ज काढून दिखावू झगमगाट, डीजेचा कर्कश्य आवाज, दारूबाजी, अनेकांचे रुसवेफुगवे यामुळे लग्नसोहळे संस्कृतीचा ऱ्हास करणारे होताहेत. या भयंकर स्थितीमुळे समाजाची नितिमूल्ये लोप पावत चालली आहे. म्हणून चांगल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी तरुणाने […]

रामनामाच्या उत्सवी वातावरणात इगतपुरी तालुका सजला : गावागावात प्रभू श्रीरामाचा जागर आणि विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – अयोध्येत हजारो वर्षानंतर आज प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत. ह्या आनंदोत्सवानिमित्त इगतपुरी तालुक्यातील गावागावात राममय वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावात मागील एका महिन्यापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरु असल्याने रामनामाची महती आणि होणाऱ्या सोहळ्याची पूर्वतयारी करायला मदत झाली. रोषणाई, फुलांची आरास आणि रांगोळ्या काढून सजलेल्या मंदिरांमध्ये आज पहाटेपासून राममय वातावरण निर्माण झाले […]

इगतपुरी तालुक्यातील ३ ठिकाणे प्रभू श्रीरामाच्या सानिध्याने पावन : “असा” आहे रामायणकालीन पौराणिक इतिहास

नहि तद्भविता राष्ट्रं यत्र न रामो न भूपतिः । तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥(- वाल्मिकी रामायण २/३७/२९) ‘श्रीराम जेथे नसेल, ते राष्ट्र राष्ट्रच राहणार नाही आणि जेथे राम असेल तो उजाड प्रदेश, वनवासी भागही राष्ट्र होईल.’ थोर तत्त्वज्ञ, चिंतक, तपस्वी वशिष्ठ ऋषींचे हे वाल्मिकी रामायणातील उदगार आहेत. राष्ट्रपुरुष प्रभू रामचंद्राचे अनन्य महात्म्य सार्थ, […]

error: Content is protected !!