संस्कृतीरक्षक विवाह सोहळा – वारकरी अन धारकरी यांच्यासोबत नवरी नवरदेवही नृत्यात रंगले : प्रेरणादायी विवाह सोहळ्याचा सर्वांपुढे आदर्श

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – सध्याचे विवाह सोहळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडणारे ठरत आहेत. अनाठायी बाबींवर होणारे खर्च, कर्ज काढून दिखावू झगमगाट, डीजेचा कर्कश्य आवाज, दारूबाजी, अनेकांचे रुसवेफुगवे यामुळे लग्नसोहळे संस्कृतीचा ऱ्हास करणारे होताहेत. या भयंकर स्थितीमुळे समाजाची नितिमूल्ये लोप पावत चालली आहे. म्हणून चांगल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी तरुणाने […]

रामनामाच्या उत्सवी वातावरणात इगतपुरी तालुका सजला : गावागावात प्रभू श्रीरामाचा जागर आणि विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – अयोध्येत हजारो वर्षानंतर आज प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत. ह्या आनंदोत्सवानिमित्त इगतपुरी तालुक्यातील गावागावात राममय वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावात मागील एका महिन्यापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरु असल्याने रामनामाची महती आणि होणाऱ्या सोहळ्याची पूर्वतयारी करायला मदत झाली. रोषणाई, फुलांची आरास आणि रांगोळ्या काढून सजलेल्या मंदिरांमध्ये आज पहाटेपासून राममय वातावरण निर्माण झाले […]

इगतपुरी तालुक्यातील ३ ठिकाणे प्रभू श्रीरामाच्या सानिध्याने पावन : “असा” आहे रामायणकालीन पौराणिक इतिहास

नहि तद्भविता राष्ट्रं यत्र न रामो न भूपतिः । तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥(- वाल्मिकी रामायण २/३७/२९) ‘श्रीराम जेथे नसेल, ते राष्ट्र राष्ट्रच राहणार नाही आणि जेथे राम असेल तो उजाड प्रदेश, वनवासी भागही राष्ट्र होईल.’ थोर तत्त्वज्ञ, चिंतक, तपस्वी वशिष्ठ ऋषींचे हे वाल्मिकी रामायणातील उदगार आहेत. राष्ट्रपुरुष प्रभू रामचंद्राचे अनन्य महात्म्य सार्थ, […]

“एकनाथ” नावाच्या ५१ पेक्षा व्यक्तींच्या सहभागाने मुंढेगावला होणार दिमाखदार हरिनाम सप्ताह : श्री संत एकनाथ महाराज जलसमाधी चतुशतकोत्तर महोत्सवानिमित्त भाविकांना मेजवाणी

एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज – प्रारंभापासून अखेरच्या दिवसांपर्यंत म्हणजेच ७ दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी फक्त “एकनाथ” नावांचेच प्रवचनकार, कीर्तनकार, मृदंगमणी, गायक, टाळकरी, चोपदार, विणेकरी, अन्नदाते असणार आहेत. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील गतीर बंधू यांनी ह्या जगावेगळ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या ह्या सप्ताहात तब्बल ५१ […]

इगतपुरी येथील कानिफनाथ मठात प्रचंड उत्साहात दत्तजयंती साजरी : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामाचा दिवसभर गजर

इगतपुरीनामा न्यूज – गुरुदेव गुरुदत महाराज जन्मोत्सवाच्या मंगलमय पर्वावर महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी इगतपुरी येथील कानिफनाथ महाराज मठात हजेरी लावली. मागील आठवड्यापासून सुरु झालेला सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर बाळासाहेब भगत यांच्या यांच्या सुमधुर भक्तीगीतांचा आस्वाद भाविकांना मिळाला. आज सकाळपासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..कानिफनाथ महाराज […]

श्री गुरुदेव – स्व स्वरूप संप्रदाय इगतपुरी तालुक्यातर्फे इगतपुरी ते कावनई पायी पालखी सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रावण मास‌ निमित्ताने आणि २७, २८ ऑगस्टला नियोजित असलेल्या समस्या मार्गदर्शन कार्यक्रमा निमित्ताने स्व स्वरूप संप्रदाय इगतपुरी तालुक्यातर्फे इगतपुरी ते श्री क्षेत्र कावनई पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ८०० ते ९९० भाविक महिला आणि पुरुषांनी ह्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद घेतला. डोक्यावर मंगल कलश आणि […]

इगतपुरी येथे अधिक मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाला प्रारंभ

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठात मठाधिपती हभप गुरुवर्य तपोनिधी माधवबाबा घुले यांच्या आशीर्वादाने अधिकमास तथा पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सवात  प्रारंभ झाला. यात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्रीमद्भभागवत कथा प्रवक्ते हभप जगदीश महाराज जोशी यांची दररोज दुपारी २ ते ५ या दरम्यान कथासेवा होणार आहे. पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरीपारायण, श्रीमद्भागवत […]

“प्रियदर्शनी” मध्ये विद्यार्थ्यांनी भरवली विठ्ठल नामाची शाळा

इगतपुरीनामा न्यूज – पंढरीच्या विठूरायाचे आणि आषाढी एकादशीचे महत्व शाळेतील चिमुकल्यांना कळावे म्हणून सालाबादप्रमाणे यंदाही प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वारीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम विठ्ठलाची पूजा करून आरती करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत शाळेत आले. सोबतच तुळशी वृंदावन आणले गेले. टाळ्या आणि टाळांच्या गजरात विठू नामाचा जयघोष करण्यात आला. […]

आषाढी एकादशी विशेष विठ्ठल रांगोळी

– माधुरी संजय पैठणकर, पाथर्डी पांडुरंगकांती दिव्य तेज झळकतीरत्‍नकीळ फांकती प्रभा ।अगणित लावण्य तेजः पुंजाळले ।न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणिलोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. गावच्या ठिकाणी अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास […]

परमेश्वराची उपासना करणे गावाचे परम कर्तव्य – माधव महाराज घुले : उभाडे येथे हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येकाने श्रेष्ठांच्या परंपरेने चालले पाहिजे. दयानिधी संत मार्ग दाखवून गेले असून त्याच मार्गाने आपल्याला जायचे आहे. जीर्णोद्धार केल्याने पुण्य प्राप्त होते. ध्यान भक्ती करण्यासाठी चांगली मूर्ती आवश्यक असून उपासना करणे गावाचे परम कर्तव्य आहे असे निरुपण मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांनी केले. उभाडे येथील हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मठाधिपती […]

error: Content is protected !!