डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त साकुरफाटा येथे बैठक

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील साकुरफाटा येथे डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर महाराज यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त सर्व शिष्य व भक्तपरिवाराकडून भव्य दिव्य अमृतमहोत्सत्व सोहळा साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रामकृष्ण ते श्रीमहंत महामंडलेश्वर द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज साधनेचा एक तेजस्वी जीवन प्रवास प्रेरणा देणारा आहे. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार, संत तुकोबारायांचे तत्वज्ञान, लोकशिक्षण, लोकसंवाद, संतांची शिकवण, समाजप्रबोधन, समाज जागृतीचे ध्येय, व्रत मनाशी बाळगून महाराज व्रतस्थपणे आयुष्यभर सेवारत असल्याचे मनोगत पिंपळगाव डुकरा येथील जेष्ठ नागरिक कचरू पाटील डुकरे यांनी केले. इगतपुरी तालुक्यात डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या अलौकीक दैदीप्यमान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भक्तगण सरसावले आहेत. बैठकीत अमृतमहोत्सवानिमित्त सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी निवृत्ती पाटील जाधव, कचरू पाटील डुकरे, भाऊसाहेब खातळे, पांडुरंग शिंदे, रामदास धांडे, अरुण गायकर, संपत काळे, ज्ञानेश्वर तोकडे, संदीप जाधव, राजाराम धोंगडे, रामनाथ जाधव, कचरू वाकचौरे, हभप पंढरी महाराज सहाणे, ज्ञानेश्वर तुपे, शिवा आडके, सुदाम घाडगे, राहुल खालकर, राहुल गायकवाड, महेश तुपे, हरी पाटोळे, शांताराम सहाणे, दत्तू सहाणे, ज्ञानेश्वर पागेरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!