लहवित येथे ग्रामदैवत भैरवनाथ व श्री प्राचीन हनुमंतराय जयंती व यात्रा महोत्सवानिमित्त उद्यापासून तीन दिवसीय कीर्तन सोहळा

इगतपुरीनामा न्यूज – श्रीक्षेत्र लहवित, वाडीचामळा येथे ग्रामदैवत भैरवनाथ, श्री प्राचीन हनुमंतराय जयंती व यात्रा महोत्सव, पंचकुंडात्मक रुद्रस्वाहाकार महायज्ञ व तीन दिवसीय कीर्तन सोहळा उद्या गुरुवार १० ते शनिवार १२ एप्रिल पर्यंत आयोजित केला आहे. तरी ग्रामस्थांनी या पवित्र धर्मकार्यामध्ये काया वाचा मनाने सहभागी होऊन अमृतमय संधीचा अवश्यमेव लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. उद्यापासून १२ एप्रिलपर्यंत विश्वशांतीस्तव त्रिविधताप उपशमनार्थ अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पंच कुंडात्मक रूद्र स्वाहाकार यज्ञ संपन्न करण्याचे ठरले आहे. जिज्ञासू भाविकांनी यज्ञामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यज्ञाचे मुख्य आचार्य वेदमूर्ती पं. मकरंदशास्त्री गर्गे व १२ तीर्थक्षेत्रोपाध्ये वैदिक ब्राह्मण असून कीर्तन महोत्सव सायं. ७ ते ९ गुरुवार हभप श्री वाणीभूषण विवेक महाराज केदार, अकोले, शुक्रवारी हभप श्री. ज्ञानेश्वर महाराज तुपे, बेलु, जगद्‌गुरू द्वाराचार्य महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज, लहवितकर यांची कीर्तने होणार आहेत. त्यानंतर महाप्रसाद, १२ एप्रिल रोजी दुपारी यज्ञाची पुर्णाहूति, ग्रामदेवतेस पुरणपोळी महानैवद्य दाखवला जाईल. भजनी मंडळ श्रीक्षेत्र लहवित व पंचक्रोशी प्रमुख अतिथी सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सांप्रदायिक संतवृंद या सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहे.

error: Content is protected !!