लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – “भेटी लागे जिवा लागलीसे आस” या अभंगा प्रमाणे विटेवर उभ्या असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आस आषाढी एकादशीच्या निमित्ताने सदैव वारकऱ्यांना लागलेली आहे. या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील वारकरी पताका खांद्यावर घेऊन माजी सरपंच उत्तमराव झनकर हे गेल्या १६ वर्षांपासून त्यांची पत्नी सौ. रंजना यांच्यासह पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत […]
इगतपुरीनामा न्यूज – ‘अज्ञानातून तरुन जायचं असेल तर साधूची संगतीच उपयुक्त ठरु शकते. साधु-संत हे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणार्या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असं सांगताना तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार । मन निरंतर जागविती ॥ असे आपल्याला सांगतात. अत्यंत प्रेमळ संत आपल्याला क्षणोक्षणी सांभाळत, सावरत असतात. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील जागृत देवस्थान असलेले ग्रामदेवता भवानी माता जंगी यात्रोत्सवानिमित्त उद्या मंगळवारी २३ तारखेला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविक व दुकानदारांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत गोंदे दुमाला आणि समस्त ग्रामस्थांनी केले आहे. सकाळी ७ वाजता नवीन झेंडापूजन, ९ ते ११ मारुती मंदिरात होमहवन, ११ […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे रामनवमी व हनुमान जन्मोत्सत्व तथा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवानिमित्त मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा घुले, वै. पोपट महाराज गाजरे यांच्या आशीर्वादाने मंगळवार १६ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला गायक, वादक, भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळीनी केले आहे. देवराम महाराज गायकवाड, जगदीश […]
इगतपुरीनामा न्यूज – विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्णमहोत्सव व जगदगुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्ताने नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या आशीर्वादाने, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे, जगद्गुरू तुकाराम महाराज गुरुकुलचे हभप ज्ञानेश्वर महाराज तुपे यांच्या मार्गदर्शनाने उद्या मंगळवार ९ एप्रिल पासून अखंड […]
इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहन सोहळ्यानिमित्त मंगळवारी शहरातून श्रींच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घोटीतील नागरिक आपली दुकाने बंद ठेऊन या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले होते. संपूर्ण शहर रांगोळीने सजवण्यात येऊन या मिरणुकीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – सध्याचे विवाह सोहळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडणारे ठरत आहेत. अनाठायी बाबींवर होणारे खर्च, कर्ज काढून दिखावू झगमगाट, डीजेचा कर्कश्य आवाज, दारूबाजी, अनेकांचे रुसवेफुगवे यामुळे लग्नसोहळे संस्कृतीचा ऱ्हास करणारे होताहेत. या भयंकर स्थितीमुळे समाजाची नितिमूल्ये लोप पावत चालली आहे. म्हणून चांगल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी तरुणाने […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला येथील १९७० ओल्ड प्रभू ढाब्याजवळील प्राचीनकालीन ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची वर्दळ वाढली होती. दरवर्षी लहान थोरांसह अबाल वृद्ध भाविकांची मांदियाळी याठिकाणी दाखल होत असते. या मंदिरात सकाळपासूनच भगवान शंकराची यथोचित पूजा आरती करण्यात आली. हे महादेव मंदिर जागृत देवस्थान मानले जाते. अनेकांची श्रद्धा असून प्रत्येकाला […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील ग्रामदैवत तसेच जागृत देवस्थान असलेल्या श्री जगदंबा मातेचा यात्रोत्सवाचे उद्या गुरुवारी 29 तारखेला आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी व तरुण मित्र मंडळाने केले आहे. पहाटे 4 ते 6 पर्यंत महापूजा अभिषेक, दुपारी तीन ते सात श्री जगदंबा मातेची […]