
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे उद्या शनिवारी १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त भवानी मातेची जंगी यात्रा भरविण्यात येत आहे. तरी परिसरातील दुकानदार, कटलरी, खेळणी दुकान, तमासगीर व परिसरातील भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत गोंदे दुमाला व ग्रामस्थांनी केले आहे. सकाळी ७ वाजता. नविन झेंडा महापुजन होईल, सकाळी ९ ते ११ वाजता मारुती मंदिर येथे होमहवन, सामुहीक हनुमान चालीसाचे पठन होईल, दुपारी ३ ते ४ गावातील ग्रामस्थांना व पाहुणे मंडळींना फेटे बांधणे, दुपारी ४ वाजता मारुती मंदिरासमोर रथ पुजन होईल, दुपारी ४.३० वाजेला मारुती मंदिरापासुन संपुर्ण गावामधुन भवानी मातेच्या मंदिरापर्यंत ढोल ताशाच्या गजरात, रोषणाईमध्ये भव्य मिरवणूक निघेल, मिरवणूकीत कळवणकरांचा बोहड्याचा कार्यक्रम होईल, मिरवणूकीत दिडोंरीकरांचे अश्व नृत्य होईल, मुळेगाव करांचा बोहडा होईल, सायं. ७.३० वाजता भवानी मातेची आरती व ओटी भरण, रात्री ८ ते ९.३० महाप्रसादाचा कार्यक्रम, रात्री ९.३० ते १ वा. दिपाली पुणेकर सह बाळासाहेब बेलेकर यांचा तमाशाचा कार्यक्रम अशा कार्यक्रमाची रूपरेषा आहे. १३ एप्रिलला दुपारी २.३० वाजता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत गोंदे दुमाला व समस्त गांवकरी मंडळी यांनी कळविले आहे.