
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील जानोरी येथे मठाधिपती गुरुवर्य हभप माधव महाराज घुले यांच्या शुभाशिर्वादाने व हभप अशोक महाराज धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, प्रवचनकार यांचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानामृत रसाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथाभजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायं. ६.३० ते ८.३० हरिकिर्तन व नंतर परिसरातील गुणीजनांचे भजन, जागर कार्यक्रम त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.आज शनिवारी १२ एप्रिल रोजी हभप सुदाम महाराज घाडगे, रविवारी हभप महंत अचलपुरकर बाबा, सोमवारी हभप सुरदास महाराज कातोरे, मंगळवारी हभप माधव महाराज काजळे, बुधवारी हभप माधव महाराज घुले, गुरुवारी हभप जगदीश महाराज जोशी, शुक्रवारी हभप अशोक महाराज धांडे, शनिवारी हभप भगवान महाराज गतीर यांचे सकाळी ९ ते ११ वाजता काल्याचे किर्तन होईल. किर्तनानंतर दिंडी सोहळा होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.