कोरोनाची रुग्णसंख्या झाली स्थिर

इगतपुरीनामा न्युज, दि. ४

इगतपुरी शहरासह तालुक्याची कोरोना आकडेवारी सध्या स्थिरावली आहे. लॉकडाऊन नियमांमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येच्या आकडेवारीतही बदल अपेक्षित आहे. मात्र सध्या तरी रुग्ण संख्या स्थिर असल्याने थोडाफार दिलासा मिळतांना दिसत आहे. आज हाती आलेल्या अहवालानुसार इगतपुरी तालुक्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ११ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून ६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या तालुक्यात एकूण ७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी इगतपुरीनामा सोबत बोलतांना दिली.

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!