महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी तालुका शाखेचा पुरस्कार सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेतर्फे दरवर्षी इगतपुरी तालुक्यातील सामाजिक, शिक्षण क्षेत्र व आदर्श शाळांचा सहावा सन्मान सोहळा गोंदे येथे संपन्न झाला. इगतपुरीचे पहिले आमदार महर्षी पुंजाबाबा गोवर्धने यांच्या स्मरणार्थ कर्मवीर पुरस्कार व महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष कै. अंबादास वाजे यांच्या स्मरणार्थ गुणवंत शिक्षक पुरस्कार व शिक्षक संघाचे नेते आर. के. खैरनार यांच्या स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष पृथ्वीबाबा शिरसाठ, जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती नाठे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पेखळे, राज्य सदस्य बाजीनाना सोनवणे, कोषाध्यक्ष शांताराम काकड, राज्य संपर्कप्रमुख रामदास शिंदे, कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे, विभागीय कार्यकारी अध्यक्ष प्रमोद शिरसाठ, माजी सभापती सोमनाथ जोशी, विस्ताराधिकारी अशोक  मुंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावर्षी महर्षी पंधरावा गोवर्धने कर्मवीर पुरस्कार इगतपुरी तालुक्यातील धार्मिक क्षेत्रासाठी धनंजय महाराज गतीर ,वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. हनुमंता यादव बांगर, क्रीडा क्षेत्रासाठी हर्ष व्यास पत्रकारितेसाठी गणेश घाटकर, सामाजिक क्षेत्रासाठी सुभाष गायकर, राजकीय शिल्पा किसन आहे. संस्थागत क्षेत्रासाठी बाल भैरवनाथ फाउंडेशन भरवीर यांना प्रदान करण्यात आला.

स्व. अंबादास वाजे गुणवंत शिक्षक पुरस्कार सुवर्णा दामोदर म्हस्के, ज्ञानेश्वर पंडित देसले, तुकाराम रामदास वाजे, विष्णू पंढरीनाथ बोराडे, गंगाधर कारभारी व्यवहारे, राजेश रामदास खैरनार, लक्ष्मण बळीराम सावंत या गुणवंत शिक्षकांना प्रदान करण्यात आले. स्व. आर. के. खैरनार आदर्श शाळा पुरस्का जिल्हा परिषद शाळा जामुंडे, सांजेगाव, खंबाळे, तळोघ, टाकेद खुर्द, कडवा वसाहत, तेलमवाडी यांना देण्यात आला. यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप धांडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण कातळे, तालुका सरचिटणीस संतोष शिरसाठ व सर्व कार्यकर्त्यांनी शिक्षक संघात प्रवेश केला. दरवर्षीप्रमाणे शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दिंडोरी तालुकाध्यक्ष सचिन वडजे, सिन्नर तालुकाध्यक्ष संजय भोर, शिक्षक संघाचे जिल्हा सल्लागार धनराज वाणी, नाशिक तालुका सरचिटणीस सुभाष भदाणे, त्र्यंबक तालुका सरचिटणीस रवींद्र देवरे व इगतपुरी तालुक्यातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक संघाचे सुमारे ५०० सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा नेते उमेश बैरागी, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष संगीता पवार, तालुकाध्यक्ष भिला अहिरे, तालुका सरचिटणीस विनायक पानसरे, कार्याध्यक्ष दीपक भदाणे, लालू गारे कोषाध्यक्ष कैलास सूर्यवंशी, चिटणीस विवेक आहेर, कार्यालयीन चिटणीस हितेंद्र महाजन, महिला आघाडी अध्यक्ष माधुरी पाटील, महिला आघाडी सरचिटणीस सुशीला चोथवे, सुरेखा गुंजाळ पल्लवी गवांदे, प्रेमलता चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!