बार्टी कडून इगतपुरी तालुक्यात “जागतिक पर्यावरण दिन” साजरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टी पुणे यांच्याकडून महाराष्ट्रात ५० हजार झाडे लावण्याचा उपक्रम घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील निनावी, पिंपळगाव घाडगा, पिंपळगाव डुकरा आणि साकुर या गावात वृक्षारोपण करण्यात आले.
बार्टी कडून शालिनी काळे आणि रुपाली आढाव यांनी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी यांच्या मदतीने हे कार्यक्रम घेतले. यात ऑक्सिजन पुरवठा वाढवणाऱ्या झाडांसोबतच फळांची झाडे देखील लावण्यात आली. जेणेकरून भविष्यात कुणी ऑक्सिजन मिळाले नाही म्हणून जीव गमावू नये यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमात गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
यावेळी निनावीचे सरपंच गणेश टोचे, पिंपळगाव घाडगाचे सरपंच  देविदास देवगिरे, पिंपळगाव डुकराच्या सरपंच मालन वाकचौरे साकुरचे विनोद आवारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले. उपस्थितांनी लावलेली झाडे जगवण्याची ग्वाही दिली आहे.यावेळी तुकाराम सहाणे, विष्णू सहाणे, कचरू सहाणे, भीमा सहाणे, खंडू रायकर, रामदास उगले आदींसह गावातील जेष्ठ नागरिक, लहान मुले, महिला आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!