इगतपुरीनामा न्यूज, दि. 23
पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा हा अत्यंत महत्त्वाचा असलेला रस्ता शासनाच्या हलगर्जीपणामुळे खड्ड्यांसह शेवटची घटका मोजत आहे. या परिसरातील नागरिक या रस्त्यामुळे खूप त्रस्त आहे. रस्त्यामधील खड्ड्यांमुळे परिसरातील रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांना घोटी, नाशिक, अकोले भागात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता इतका खराब झाला आहे की खड्ड्यांच्या साम्राज्यातून पुढे जावे लागते. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहे. शाळकरी विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, शेतकरी अतिशय त्रस्त झालेले आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेण्यासाठी नेण्यासाठी हाच रस्ता आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ह्या रस्त्याकडे शासनाचे लक्ष नसल्याने 28 सप्टेंबरला खड्ड्यांमध्ये भव्य वृक्षारोपण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ह्या खराब रस्त्यामुळे कित्येक गाड्यांचे एक्सल वगैरे तुटलेले आहे. त्यामुळे लोकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. खंडेराव झनकर यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांशी चर्चा आणि निवेदन देऊन या रस्त्याचे दुरुस्तीचे काम लगेच नव्याने काम सुरू करण्याबाबत शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र शासन या रस्त्याबाबत उदासीन आहे. त्यामुळे शिवसेनेचे खंडेराव झनकर यांनी शासनाच्या हलगर्जीपणाला कंटाळून 28 सप्टेंबरला या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या आदेशान्वये शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख साहेबराव झनकर, गणप्रमुख शिवाजी काळे, भिमराव साबळे ,युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, बाळासाहेब घोरपडे, सुदाम भोसले, नवनाथ बऱ्हे, कैलास गाढवे, रंगनाथ कचरे, पांडुरंग गाढवे, शिवाजी गाढवे, भाऊसाहेब वाजे, साहेबराव बांबळे, दिलीप पोटकुले, गणेश टोचे, अशोक बोराडे, पोपटराव लहामगे, बहिरू केवारे, हेमंत झनकर, भास्कर वाजे यांना सोबत घेऊन या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये शिवसैनिकांसोबत वृक्षरोपण करण्याचे ठरवले आहे. दिनांक 28 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये शिवसैनिक वृक्षारोपण करून शासनाचा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे दुरुस्तीचे काम व मंजूर झालेले नवीन कामे लवकरात लवकर केले नाही तर तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे समजते. ह्या कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.