
इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्धल जागृतीसाठी इगतपुरी नगरपरिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत प्रत्येक शालेय व महाविद्यालय स्तरावर पर्यावरण संवर्धन व जतन या विषयावर आधारित रांगोळी, पोस्टर मेकिंग, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये नाशिप्र मंडळ संचलित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे नियोजन पर्यावरण विभाग प्रमुख प्रा. जयश्री भालेराव यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना नगर परिषदेकडून मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्या प्रा. प्रतिभा हिरे यांनी भूषवले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. बाळू घुटे, प्रा. ललिता अहिरे, प्रा. अविनाश कासार आदी उपस्थित होते. विद्यार्थिनी भाग्यश्री खारके, प्रा. दिपाली तोटे, प्रा. शशिकांत सांगळे, प्रा. काजल ढिकले, प्रा. प्रतिभा सकट, प्रा. भाग्यश्री मोरे, प्रा. सचिन मुसळे, प्रा. कांतीलाल दुनबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती सोनवणे यांनी तर आभार प्रा. रत्ना खानदेशी यांनी मानले.