शासनाच्या नियमांचे पालन करून एकजुटीने नवरात्रौत्सव साजरा करावा – अनिल पवार : वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठक संपन्न

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 22

शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून एकजुटीने नवरात्र उत्सव साजरा करावा असे आवाहन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी केले. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या गावातील नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अनिल पवार बोलत होते. यावेळी सण उत्सव योग्य पद्धतीने साजरे करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. कुठल्याही गावात कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार, वाद विवाद होऊ नये याची खबरादारी घ्यावी. सर्वांनी एकजुटीने राहून प्रयत्न करावेत. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक पवार यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी उपनिरीक्षक रमेश अहिरे, पोलीस नाईक प्रवीण काकड, सोमनाथ बोराडे, लहू भावनाथ, पोलीस हवालदार प्रवीण मोरे, राजेंद्र कांगणे, भगवान खरोले, मोहन वारुंगसे, समाधान बुचडे, सुनील भाडमुखे, जीवन मुतडक, गोरख मुतडक, अजय चोथे, मनोहर राऊत, विशाल मुतडक, जीवन चोथे, दीपक चोथे, रोहन चोथे, शंकर सोनवणे, रमेश बांगर, हिरामण कातोरे, भगवती धात्रक आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते