इगतपुरीनामा न्यूज, दि. 23
राज्य शासनाच्या "सेवा पंधरवडा उपक्रम" अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसिलदार आणि जात प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची "जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया व जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यपद्धती" याबाबत ऑनलाईन कार्यशाळा आज संपन्न झाली. ही कार्यशाळा आज दुपारी ३ ते ६ या वेळेत घेण्यात आली. नाशिक जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष आणि नाशिक विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालक गीतांजली बाविस्कर यांच्यासह या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये उपजिल्हाधिकारी तथा बागलाणचे प्रांताधिकारी बबन काकडे आणि नाशिक जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य माधव वाघ यांनी या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. सहभागी अधिकाऱ्यांनी ह्या कार्यशाळेचा कामकाज करण्यासाठी खूपच उपयोग होणार असल्याचे सांगितले.