महामार्गांची दुरुस्ती करतांना खेड्यांतील रस्त्यांकडे दुर्लक्ष नको इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती होत असताना ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या खेड्यापाड्यातील रस्त्यांच्याही डागडुजीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते यांनी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार यांना […]
सरपंच खंडेराव धांडे व उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्या पाठपुराव्याला यश प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १ पाडळी देशमुखच्या रेल्वेलाईनखालील मोरीच्या रुंदीकरणासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेचे अधिकारी एस. सी. शर्मा यांच्यासमवेत समक्ष पाहणी करीत मोरीच्या ३ […]
इगतपुरीनामा न्यूज दि. २८ : राष्ट्रीय महामार्ग विभागाने खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक-मुंबई महामार्गाच्या पाहणी दौऱ्याची आणि तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. टोल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच नाशिक-मुंबई महामार्गाची दुरावस्था झाल्याचा ठपका ठेवला असून महामार्गाच्या दुरुस्तीसाठी १५ ऑक्टोंबर पर्यंन्तचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत महामार्गाची संपूर्ण दुरुस्ती न झाल्यास मुंबई-नाशिक एक्सप्रेसवे प्रा. लिमीटेड या टोल कंपनीच्या […]
इगतपुरीनामा न्यूज दि. २८ : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पावसाने इगतपुरी शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली. जवळपास दोन तास झालेल्या या मुसळधार पावसाने काही काळासाठी जनजीवन विस्कळित झाले होते. दरम्यान इगतपुरी शहर आणि परिसरात रस्त्यांमधील खड्डे ही नेहमीची डोकेदुखी आहेच, मात्र पावसाळ्यात याची तीव्रता चांगलीच वाढलेली दिसते. मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ इगतपुरी तालुक्यातील घोटी ते काळुस्ते हा रस्ता दहा ते पंधरा गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याला आजच्या स्थितीत खूप मोठं मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. ह्या रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी त्वरीत उपाययोजना कराव्यात अशी मागणी इगतपुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेने केली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग […]
प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ नाशिक आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, त्यात पाण्याचे साचलेले डबके, हाडे खिळखिळी करणारी उखडलेली खडी या सर्वांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी संघटनेचे नेते तथा घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांनी मुंबई नाशिक एक्सप्रेसवे घोटी टोल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे […]
मागण्या पूर्ण न झाल्यास २० सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ रस्त्यावर पडलेले मोठ-मोठ खड्डे…पॅचिंग केलेल्या रस्त्याची कच उखडलेली…ठिकाण ठिकाणी रस्त्यावरच पाणी साचून तयार झालेले तळे… त्यातून जाणारी वाहने अशी परिस्थिती मुंबई आग्रा महामार्गाची झाली आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने वाहतूक जास्त असून या महामार्गावर सर्वाधिक अवजड वाहतूक सुद्धा असते. अशा परिस्थितीत वाहनधारक मेटाकुटीला […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या खैरगाव ते शेणवड बुद्रुक ह्या रस्त्यावरील नव्या पुलामुळे दोन्ही बाजूकडील नागरिकांचा पावसाळ्यातील त्रास कायमचा संपला आहे. पूल बांधल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यातील चित्र पाहून आदिवासी नागरिकांनी आत्यंतिक समाधान व्यक्त केले आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, उपसभापती विठ्ठल लंगडे, उपसरपंच कैलास कडू यांच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या इगतपुरी तालुक्यातील भाम धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना हेक्टरी ९ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. दुसरीकडे बांधण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्गातील प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी ७ लाख ५० हजार रुपयांचा मोबदला दिला गेला. त्यामुळे भाम प्रकल्पग्रस्तांमध्ये मोबदल्याच्या बाबतीत भेदभाव झाल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी थेट आमदार हिरामण खोसकर […]
संतापलेल्या नागरिकांची रिक्त पदे भरण्याची मागणी इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि आरोग्यावर ताण असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून वाडीवऱ्हे ओळखले जाते. कोरोना काळापासून तर ह्या आरोग्य केंद्राला अतिरिक्त कामे करावी लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना काय असतो ह्याचे मोठे उदाहरण म्हणजे वाडीवऱ्हे आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्रासह अनेक उपकेंद्रांत […]