इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी तालुक्यातील घोटी ते काळुस्ते हा रस्ता दहा ते पंधरा गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याला आजच्या स्थितीत खूप मोठं मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. ह्या रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी त्वरीत उपाययोजना कराव्यात अशी मागणी इगतपुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेने केली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग इगतपुरीचे उपअभियंता कौस्तुभ पवार यांना संघटनेने निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
काळुस्ते, भरवज, निरपण, तळोघ, कांचनगाव, मांजरगाव, आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, कुरुंगवाडी, अवचितवाडी, ठाकूरवाडी, बोरवाडी, सारुक्तेवाडी, दरेवाडी या गावांना हा जोडणारा रस्ता आहे. सध्याच्या काळात ह्या रस्त्यावरून वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे हा रस्ता अजूनच खराब झाला आहे. म्हणून त्वरित दुरुस्ती करून लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी प्रहार तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, उपाध्यक्ष सोपान परदेशी, प्रसिद्धी प्रमुख मंगेश शिंदे, माजी सरपंच अनिता घारे, चंद्रकांत घारे, ज्ञानेश्वर घारे, नंदू घारे,कैलास घारे, विठ्ठल घारे, गंगाराम पाटील, प्रकाश घारे, योगेश घारे, ग्रामपंचायत सदस्य आणि काळुस्ते ग्रामस्थ उपस्थित होते.