इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दिवाळीपूर्वी दुरुस्ती करावी : आत्माराम मते यांची मनसेतर्फे ना. गडकरी यांच्याकडे मागणी

महामार्गांची दुरुस्ती करतांना खेड्यांतील रस्त्यांकडे दुर्लक्ष नको

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती होत असताना ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या खेड्यापाड्यातील रस्त्यांच्याही डागडुजीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते यांनी केली आहे. केंद्रीय  रस्ते वाहतूक आणि बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार यांना भेटून त्यांनी निवेदनाद्वारे ग्रामीण रस्त्यांसाठी गाऱ्हाणे मांडले. ना. गडकरी आणि ना. पवार यांनी ह्या सूचनांचा योग्य विचार करण्याचे आश्वासन दिले. इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून ह्यामुळे ग्रामीण जनतेत असंतोष आहे. निव्वळ महामार्ग दुरुस्ती करून ग्रामीण नागरिकांना दिलासा मिळणार नाही. यासाठी प्राधान्याने ग्रामीण रस्त्यांना सुद्धा दिवाळीपूर्वी झळाळी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, ना. भारती पवार यांना भेटून इगतपुरी तालुक्यातील सर्व रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी गाऱ्हाणे मांडले. यावेळी आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे आदी मान्यवर हजर होते. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, भाजपच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. प्रशांत मुर्तडक, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. वैभव महाले, मनविसे इगतपुरी विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, गणेश झोमान, किरण बोंबले आदी राजसैनिक उपस्थित होते.

खेडे आणि आदिवासी वाड्यांतील रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी आदींना मोठा त्रास सोसावा लागतो. इगतपुरी तालुक्यातील जवळपास सगळ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. वारंवार मागण्या करून संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत. राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीकडे शासनाचे विशेष लक्ष आहे. मात्र ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या खेड्यांतील रस्त्यांकडे  सुद्धा प्राधान्याने लक्ष घालावे. दिवाळीपूर्वी ग्रामीण रस्त्यांना नवी झळाळी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार यांच्याकडे वाडीवऱ्हे येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय निर्मित करावे, इगतपुरी तालुक्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरावी अशा मागण्या करण्यात आल्या. सर्व मागण्यांवर विचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी मंत्र्यांनी दिले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!