त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे बुजवा : नितीन तिदमे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचा आंदोलनाचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ अंबोली फाटा ते वेळुंजे तुपादेवी तळवाडे फाटा ते रोहीले गिरणारे वाघेरा फाटा ते साप्ते फाटा या तालुक्यातील महत्वाच्या आणि सततची वाहतुक चालु असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पडलेले मोठमोठे खड्डे हे अतिशय जीवघेणे आहेत. वाहन चालकांना वाहन चालवणे अतिशय खडतर झाले आहे. यामुळे खुप मोठा त्रास होत असून अनेक […]

पारदेवी येथील आदिवासी कातकरी वाडीच्या विहिरीत घुसले शौचालयाचे पाणी

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिक तापाने फणफणले इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पारदेवी येथील येथील एका उच्चभ्रु हॉटेलच्या शौचालयाचे आणि वापरायला अयोग्य पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उतरले आहे. त्या पाण्यामुळे येथील कातकरी वस्तीतील आदिवासी कातकरी नागरिक तापाने फणफणले आहेत. ह्या वाडीत 10 कातकरी कुटुंब राहत असून अंदाजे 40 ते 50 लोकांचे […]

“आई जेवू घालीना अन बाप भीक मागू देईना” : त्र्यंबक तालुक्यातील अर्थमूव्हर्स तरुणांची अवस्था बिकट

वड्याचे तेल वांग्यावर काढू नका : बेरोजगारांची अधिकाऱ्यांना विनवणी ज्ञानेश्वर मेढेपाटील, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ ब्रम्हगिरी उत्खनन प्रकरणी काही लोकांच्या गैरप्रकारांमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अर्थमूव्हर्स क्षेत्रातील होतकरू तरुणांना चांगलाच फटका बसला आहे. कामे असूनही शासनाच्या निर्बंध आदेशामुळे घरीच बसावे लागणार असल्याने तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे वाहनांना अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांनी तगादे सुरू केल्याने […]

शहरवासीयांचा संताप : इगतपुरी शहर रात्रभर अंधारात

इगतपुरीनामा न्यूज दि. ११ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे इगतपुरी शहराचा काही भाग रात्रभर अंधारात असून आठ तास उलटूनही विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. इगतपुरी शहर आणि परिसरात विजेचे अघोषित भारनियमन नित्याचेच झाले असून अनेकदा सांगूनही यावर काहीही उपाययोजना केली जात नसल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी […]

इगतपुरीतील खड्डेमय रस्त्यात लावली झाडे ; भाजयुमो आणि जनसेवा प्रतिष्ठानचे नवीन रस्त्यासाठी आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ इगतपुरी शहरातील जुन्या राष्ट्रीय महामार्गाची गेल्या सहा वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर […]

इगतपुरी तालुका बेरोजगार मुक्तीसाठी युवकांनी एकत्र यावे : भूमिपूत्र फाऊंडेशनचे आवाहन ; विविध प्रकल्पांमुळे तालुक्यातील हजारो युवक बेरोजगार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ इगतपुरी तालुक्यातील विविध प्रकल्पासांठी शासनाने हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन बेरोजगारीवर मात करण्याचे आवाहन भूमिपूत्र फाऊंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष विनोद नाठे यांनी केले आहे. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या […]

कल्याण, कसारा, इगतपुरी दरम्यान रेल्वे गाड्यांतील निकृष्ट खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा :  जागरूक प्रवाशांची मागणी

किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ कोरोनामुळे रेल्वे गाड्यांतून गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्य जनतेला प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी वर्गांकरीता परवानगी देण्यात आली आहे. अधिकृत ओळख पत्र असल्या शिवाय प्रवाशांना तिकीट देण्यात येत नाहीत. असे असताना इगतपुरी व कसारा रेल्वे स्थानकांतुन अनाधिकृत बाहेरील फेरीवाले चालत्या मेल – एक्सप्रेस […]

दुर्गम आदिवासी भागात रेशन कार्डवर रॉकेल उपलब्ध करा ; बिरसा ब्रिगेड ( सह्याद्री ) संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अनेक आदिवासी कुटुबांना अद्यापही गॅस सिलेंडरचे कनेक्शन मिळालेले नाही. तर गॅस कनेक्शन मिळालेल्या अनेक आदिवासी कुटुबांची आजही आर्थिक परिस्थिती गॅस सिलेंडर विकत घेण्याची नाही. त्यामुळे त्यांच्याकडे शासनाने दिलेल्या गॅस सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या पडुन आहेत. संबंधितांना रॉकेल उपलब्ध झाले तर किमान कमी दरात चुल तरी पेटेल. […]

आश्चर्यच…इगतपुरी तालुक्यातील “ह्या” रस्त्याला कोणी वाली नाही ?

हरिदास लोहकरे यांचा पाठपुरावा अन् खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांनी होणार दर्जेदार रस्ता इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ इगतपुरी तालुक्यातील मोठी पौराणिक परंपरा लाभलेल्या टाकेद ते धामणगाव ह्या महत्वपूर्ण रस्त्याला कोणी वाली नसल्याचे समोर आले आहे. ह्या रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे ह्या भागासह विविध गावांतील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांची शृंखला असे ह्या रस्त्याचे वैशिष्ठय असून […]

१५ दिवसांपासून सामूंडी अंधाराच्या साम्राज्यात ; विद्युत रोहित्र नादुरुस्त ; आर्थिक व्यवहार ठप्प

तुकाराम रोकडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामूंडी येथील विद्युत रोहित्र गेल्या १५ दिवसांपासून नादुरुस्त झाले आहे. यामुळे गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे. बँकेच्या व्यवहारात खंड पडला असून नागरिकांचे ऐन शेती कामाच्या हंगामात आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यासंदर्भात महावितरण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. […]

error: Content is protected !!