इगतपुरीनामा न्यूज – महायुती सरकारच्या लोकाभिमुख आणि विकासाच्या योजना, आमदार हिरामण खोसकर यांनी केलेली विकासकामे, तगडा जनसंपर्क आणि शिवसैनिकांची अफाट ताकद महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधासभेत पाठवणार आहेत. तरीही शिवसैनिकांनी गाफिल नं रहाता जास्तीतजास्त मतांनी निर्णायक मतदान महायुतीला मिळण्यासाठी सक्रियतेने काम करावे, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आणि महायुतीचे स्वप्न करण्यासाठी जीवाचे रान […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा एकमेव मतदासंघ नाशिक लोकसभा मतदारक्षेत्रात शिवसेना शिंदे गटाकडे आहे. ह्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार देणे अत्यंत आवश्यक आहे. शिवसेनेचा उमेदवार इगतपुरी मतदारसंघातून निश्चितच निवडून येणार आहे. या ठिकाणी शिवसेनेची जागा कायम न ठेवल्यास शिवसेनेला मोठे नुकसान होणार आहे. सर्व शिवसैनिकांची सुद्धा हिच भावना असून महायुतीमधील अन्य […]
इगतपुरीनामा न्यूज – माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना मिळालेल्या आदिवासी विकास महामंडळ अध्यक्षपदाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा राज्यमंत्री दर्जा लाभला आहे. मात्र ह्या अध्यक्षपदामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघावरील उमेदवारीचा दावा काशिनाथ मेंगाळ यांनीही कायम ठेवला आहे. शिंदे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ना. […]
भास्कर सोनवणे – इगतपुरीनामा न्यूज – २००४ पूर्वीच्या काळात इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाचे भयाण वास्तव, पाण्यासाठी गावोगावी होणारा मायबहिणींचा आटापिटा, शिक्षणाच्या सोयीसुविधांचा अभाव, रस्ते आणि दळणवळणाच्या दरिद्री व्यवस्था, युवकांना स्वयंरोजगार आणि हक्काच्या रोजगारासाठी करावी लागणारी कसरत आणि भूमिपुत्र शेतकऱ्यांचा पिकांना पाणी द्या म्हणणारा आर्त टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. हे जळजळीत भयानक वास्तव […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी कमी व्हावी म्हणून दोन्हीही तालुक्यात अजून औद्योगिक वसाहतीसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे. इगतपुरी त्र्यंबकला मोठ्या कंपन्या आणल्यानंतर येथील स्थानिक बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. मोठ्या प्रमाणात धरणे असून देखील मार्च महिन्यानंतर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यावर […]
इगतपुरीनामा न्यूज – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव, जनसेवेच्या कामाचा छंद, आणि सामाजिक कार्यात तन मन धनाने काम करण्याची प्रवृत्ती ह्या तीन सूत्रांवर इगतपुरी तालुक्यात काम उभे करणारे हाडाचे शिवसैनिक मोहन रामजी बऱ्हे यांची शिवसेना ( शिंदे गट ) उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. बाल शिवसेना शाखाप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख हा उत्तुंग प्रवास अनुभवणाऱ्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहिसर येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे ४ दिवसीय शिबीर संपन्न झाले. या शिबीर कालावधीत धामडकीवाडीचा रस्ता दुरुस्ती, शाळेला किचन शेड, शालेय आवारात व वाडीत सोलर स्ट्रीट काम पूर्ण करण्यात आले. सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलमार्फत ६ वर्षांपासून भगतवाडी आणि धामडकीवाडी भागात शिबीर राबवत असते. यानिमित्ताने […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 30 हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रत्यक्षात लोकांच्या मनामनात पोहोचवणारी शिवसेना सत्य आणि वास्तव आहे. सामान्य शिवसैनिक ह्यामुळेच उद्धव साहेबांच्या सोबत असल्याचे दिसून येते. गैरसमज निर्माण करून तालुक्यातील काही स्वार्थी लोकांनी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात ओढले. कैलास गाढवे, खंडेराव शिवराम झनकर, पांडुरंग गाढवे, हरीभाऊ वाजे, साहेबाराव झनकर यांच्यामुळे मला […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 27 इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, खेड भैरव परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे भातपिकांसह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी धामणगाव गटात पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान डोळ्यात पाणी आणणारे असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, इगतपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांबाबत शासनदरबारी आवाज उठवावा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 5 धामणगाव खेड गटातील शिवसैनिक अभूतपूर्व संख्येने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी आज रवाना झाले. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या आदेशाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार राजाभाऊ वाजे, तालुकाप्रमुख भगवान आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, गटप्रमुख साहेबराव […]