शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हिरामण खोसकर यांच्यासाठी लागले कामाला : जास्तीतजास्त मतांनी श्री. खोसकर आमदार होतील – माजी खासदार हेमंत गोडसे

इगतपुरीनामा न्यूज – महायुती सरकारच्या लोकाभिमुख आणि विकासाच्या योजना, आमदार हिरामण खोसकर यांनी केलेली विकासकामे, तगडा जनसंपर्क आणि शिवसैनिकांची अफाट ताकद महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधासभेत पाठवणार आहेत. तरीही शिवसैनिकांनी गाफिल नं रहाता जास्तीतजास्त मतांनी निर्णायक मतदान महायुतीला मिळण्यासाठी सक्रियतेने काम करावे, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आणि महायुतीचे स्वप्न करण्यासाठी जीवाचे रान करावे असे आवाहन नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केले. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या घोटी येथील महत्वपूर्ण बैठकीत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, इगतपुरी तालुकाप्रमुख संपत काळे, गणेश कदम आदी पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. 

विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नवे व जुने शिवसैनिक एकत्रित येऊन प्रचाराला लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात डोअर-टूृ-डोअर प्रचार यंत्रणा सुरू झाली असून हिरामण खोसकर यांना वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. घोटी येथे महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारात सक्रिय होण्यासाठी शिवसेनेच्या वतीने इगतपुरी मतदार सघातील पदाधिकारी बैठक संपन्न झाली. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी ही बैठक घेऊन उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी हिरामण खोसकर यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचा निर्धार केला. यामुळे महायुतीची एकजूट वाढली असून शिवसैनिक जोरात कामाला लागले आहे. आमदारांचे सुपुत्र वामन खोसकर यांनी यावेळी शिवसैनिकांनी असेच सहकार्य कायम ठेवून इगतपुरी मतदारसंघ विकसित करण्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Similar Posts

error: Content is protected !!